• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Drishyam 3 Trailer : आता हा खेळ डोक्याचा नाही, नशिबाचा… विजय साळगावकरचा शेवटचा खेळ?; ‘दृश्यम 3’चा थरारक ट्रेलर चर्चेत

September 9, 2026 by admin Leave a Comment


Drishyam 3 Trailer : ‘दृश्यम’च्या पहिल्या दोन भागांनी प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली. विजय साळगावकरच्या भूमिकेत अजय देवगणने आपल्या हुशारीने पोलिसांनाच नव्हे तर प्रत्येकाला चकमा देत रचलेली कहाणी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरली. आता या गाजलेल्या फ्रँचायझीचा शेवटचा अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दृश्यम 3’च्या रिलीजपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, तो पाहिल्यानंतर विजयसमोर यावेळी नेमकं किती मोठं संकट उभं राहणार आहे, याची उत्सुकता वाढली आहे.

2 मिनिटे 49 सेकंदांचा थरारक ट्रेलर

दृश्यमचा 2 मिनिटे 49 सेकंदांचा हा ट्रेलर दमदार संवाद आणि रहस्याने भरलेला आहे. ट्रेलरची सुरुवात सौरभ शुक्ला यांच्या संवादाने होते. तब्बू त्यांना विचारते की, विजयच्या कथेचा पुढचा भाग लिहायचा झाला तर यावेळी विजय काय करेल? त्यावर सौरभ शुक्ला सांगतात, ‘ विजय काय करेल, तो काय करणार नाही, हे फक्त विजयला माहीत आणि त्या देवाला..’ यानंतर अजय देवगणचा विजय साळगावकर पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात दिसतो. मात्र, यावेळी परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक गंभीर असल्याचे ट्रेलरवरून जाणवतं.

न्याय नको मीरा देशमुखला हवाय बदला

विजयच्या आयुष्यात पुन्हा एकदा मीरा देशमुखची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री तब्बू साकारत असलेली ही व्यक्तिरेखा आपल्या मुलगा सॅमच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी विजयच्या मागे लागली आहे. ट्रेलरमध्ये मीरा स्पष्टपणे सांगते की, तिला न्याय नको, तर माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला हवा आहे. त्यामुळे यावेळी विजयला स्वतःला केवळ पोलिसांपासून वाचवायचं नाहीये तर मीरा देशमुखच्या सूडापासूनही कुटुंबाचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील त्याच्या खांद्यावर आहे. ‘ आता हा खेळ डोक्याचा नाही, तर नशिबाचा बनला आहे.’ – अजय देवगणच्या एक संवादावरून या संपूर्ण परिस्थितीची झलक दिसते.

अभिनेते प्रकाश राज हे देखील ट्रेलरमध्ये दिसत आहेत. ते मीरा देशमुख यांच्या वकिलाची भूमिका साकारणा असून त्यांचाही एक दमदार संवाद आहे. “तो अशिक्षित आहे, पण मूर्ख नाही. त्याला कमी लेखण्याची चूक मी करू शकत नाही.”, असं ते विजयबद्दल म्हणतात.

मात्र, ट्रेलर पाहिल्यावर असं दिसतं की विजयसमोर सर्वात मोठे आव्हान हे जयदीप अहलावत उभे करणार आहेत. हाँ अभिनेता या चित्रपटात क्राइम ब्रँचच्या एसपीची भूमिका साकारत असून, ट्रेलरमध्ये ते अजय देवगणच्या विजयला जोरदार टक्कर देताना दिसलेत.

‘दृश्यम 3’ रिलीज डेट

आता विजयचा खेळ संपणार आहे की तो पुन्हा एकदा सर्वांना चकवणार आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल. ‘दृश्यम 3’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाला ‘दृश्यम: द कंक्लूजन’ असं नाव दिलंय. यावरून हा चित्रपट म्हणजे या फ्रँचायझीमधील शेवटची फिल्म असल्याचं स्पष्ट होतं. आता निर्माते या गूढ आणि थरारक कथेचा शेवट नेमका कसा करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

 

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आता थेट सातबारा उतारा…, मोठी बातमी समोर
  • Ganesh Chaturthi 2026: कोणत्या दिशेला ठेवाल गणरायाची मुर्ती? जाणून घ्या स्थापना आणि विसर्जनाचे काही नियम…
  • कधी झुकायचं, कधी गप्प राहायचं, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चाणक्यांचे हे 3 नियम लक्षात ठेवा
  • 80s Photo Trend : इन्स्टावर 80s फोटो ट्रेंडचा धुमाकूळ, ‘हे’ 10 सोपे प्रॉम्प्ट वापरून 5 सेकंदात बनवा फोटो
  • तुम्ही अडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर.., अंतरवालीमधून जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा, वातावरण तापलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in