• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आता थेट सातबारा उतारा…, मोठी बातमी समोर

September 9, 2026 by admin Leave a Comment


मोठी बातमी समोर येत आहे, सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महाभूमी स्टॅक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. आता जमिनींच्या खरेदी-विक्री व इतर व्यवहारांसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार तयार करण्यात आलं आहे.  विखुरलेल्या विविध प्रणालींचे एकत्रीकरण करून दहा प्रमुख भूमी सेवांसाठी ही एकच प्रणाली कार्यान्वीत असणार आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे.  या प्रणालीमध्ये ३.५ कोटींपेक्षा जास्त ७/१२ व ८-अ उतारे असणार आहेत.  एकाच क्लिकवर तब्बल दीड कोटी भू-नकाशे, ४० कोटी जुने फेरफार आणि नोंदणी दस्त उपलब्ध असणार आहेत. ‘ईज ऑफ लिव्हिंग’ आणि ‘ईज ऑफ डुईँग बिझनेस’ला प्रोत्साहन देणारा हा महसूल विभागाचा महत्त्वाचा टप्पा आहे, नागरिकांना जमिनीचा सर्च रिपोर्ट आणि इतर सर्व माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे, असं यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वनपट्टे दाव्यांसाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत ग्रामस्थरिय वनहक्क समिती दावे मंजूर करण्यासाठी बैठका घेणार आहे. याचा आदिवासी भागातील शेतकऱ्यांना फायदा होईल, वनपट्टे दाव्यांना ग्रमासभेतच मंजुरी मिळणार आहे. 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर दरम्यान सुनावणी होवून  या 15 दिवसांच्या मोहिमेत प्रलंबित वन पट्टे बहाल करण्यात येणार आहेत. हा देखील एक मोठा निर्णय मानला जात आहे.

शेतकऱ्यांना फायदा 

दरम्यान राज्यात गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महाभूमी स्टॅक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. यामुळे आता जमिनीचे सर्व व्यवहार एकाच छताखाली होणार आहेत. या प्रणालीमध्ये ३.५ कोटींपेक्षा जास्त ७/१२ व ८-अ उतारे असणार आहेत. तसेच एकाच क्लिकवर तब्बल दीड कोटी भू-नकाशे, ४० कोटी जुने फेरफार आणि नोंदणी दस्त उपलब्ध असणार आहेत, याचा मोठा फयदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांना सहज सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यवहारामधील अनेक अडचणी दूर होणार आहेत.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता अमृता फडणवीस यांना केंद्रीय मंत्र्यांचीही साथ; गरब्यातील मुस्लिमांच्या एन्ट्रीवरून मोठं विधान
  • सुपरस्टार असूनही केलं मोलकरीण म्हणून काम, 14 व्या वर्षीच झालं लग्न, पार्टनरनेच दिला मोठा धक्का
  • मोठी बातमी! राज्यात 3 जातीच्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार, सरकारचा तातडीचा निर्णय; थेट मंत्र्याने दिल्या सूचना
  • माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा
  • इशान किशनने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत अंतिम सामन्यात ठोकल्या 350 धावा, दुसऱ्या डावात शतक हुकलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in