
दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने जबरदस्त खेळी केली. पहिल्या डावात द्विशतकी खेळी केल्यानंतर दुसऱ्या डावात 80 धावांची खेळी केली. (Photo: PTI)
इशान किशन शतक ठोकू शकला असता, पण आक्रमक खेळी करण्याच्या नादात 80 धावांवर बाद झाला. निधीच्या गोलंदाजीवर विकेट देऊन बसला. इशानने या डावात 9 चौकार आणि 3 षटकार मारले. (Photo: PTI)
इशान किशनने पहिल्या डावात 270 धावांची खेळी केली होती. तेव्हा 334 चेंडूत 30 चौकार आणि 7 षटकार मारले होते. या धावा त्याने 80हून अधिकच्या स्ट्राईकने केली. ईस्ट झोनने पहिल्या डावात 708 धावा केल्या. (Photo: PTI)
इशान किशनने दुलीप ट्रॉफी अंतिम सामन्यात एकूण 350 धावा केल्या. दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं जेतेपद ईस्ट झोनला मिळणार हे जवळपास निश्चित आहे. कारण पहिल्या डावात ईस्ट झोन संघ सरस ठरला. त्यात हा सामना ड्रॉ होईल हे निश्चित आहे. (Photo: PTI)
इशान किशनने आतापर्यंत तीन अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. सय्यद मुश्ताक अली, टी20 वर्ल्डकप कप आणि आता दुलीप ट्रॉफीत विजयी खेळी केली आहे. (Photo: PTI)




Leave a Reply