• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ganesh Chaturthi 2026: कोणत्या दिशेला ठेवाल गणरायाची मुर्ती? जाणून घ्या स्थापना आणि विसर्जनाचे काही नियम…

September 9, 2026 by admin Leave a Comment


Ganesh Chaturthi 2026: ‘द्रिक पंचांग’नुसार, 2026 मधील गणेश चतुर्थीचा उत्सव 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर 25 सप्टेंबर रोजी गणरााचं विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर, बाप्पाची मूर्ती प्रतिष्ठापित करताना दिशा आणि काही आवश्यक नियम लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हीही यावेळी घरी बाप्पाची मूर्ती बसवण्याचा विचार करत असाल, तर केवळ पूजेच्या विधींचेच नव्हे, तर वास्तुशास्त्राच्या नियमांचंही पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच, मूर्ती स्थापनेसाठी योग्य दिशा, स्थापना ते विसर्जनापर्यंत पाळायच्या आवश्यक गोष्टींबद्दल महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या…

गणपतीच्या मूर्तीसाठी कोणती दिशा सर्वात शुभ मानली जाते?

वास्तुशास्त्रानुसार, घरात भगवान गणपतीची मूर्ती स्थापित करण्यासाठी ईशान्य दिशा सर्वात शुभ आणि पवित्र मानली जाते. ही दिशा पूजा आणि आध्यात्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. जर ईशान्य कोपऱ्यात पुरेशी जागा नसेल, तर गणपतीची मूर्ती उत्तर किंवा पश्चिम दिशेलाही ठेवता येते.

भगवान श्रीगणेशाची मूर्ती बसवताना ती कोणत्या दिशेला तोंड करून असावी, याची विशेष काळजी घेतली जाते. परंपरेनुसार, गणपतीचं मुख घराच्या आतल्या बाजूला असावे, जेणेकरून पूजा करणाऱ्या व्यक्तीला मूर्तीचा समोरील भाग दिसेल. याउलट, गणपती बाप्पाची पाठ बाहेरच्या बाजूला म्हणजेच भिंतीच्या दिशेने असावी. मूर्तीच्या मागील भागाबाबत एक विशिष्ट धारणा आहे; असं मानलं जातं की मूर्तीच्या मागील भागात दारिद्र्य वास करतं, तर समोरील भागात सुख आणि समृद्धीचा वास असतो.

घरात गणपतीची मूर्ती स्थापन करताना ती कोठे ठेवावी, याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पूजेसाठी निवडलेली जागा स्वच्छ आणि पवित्र असावी. गणेशाची मूर्ती थेट जमिनीवर न ठेवता, एखाद्या स्वच्छ उंचावलेल्या ओट्यावर किंवा लाकडी पाटावर ठेवणं योग्य मानलं जातं.

स्थापना करताना या गोष्टींची काळजी घ्या…

गणेश चतुर्थीच्या दिवशी, सकाळी अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर पूजास्थळ स्वच्छ केला. त्यानंतर, एका चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करा. श्रीगणेशाला दुर्वा, मोदक आणि फुले अर्पण केली जातात. पूजेदरम्यान ध्यानधारणेद्वारे श्रीगणेशाचं आवाहन केलं जाते आणि विहित विधींनुसार त्यांची पूजा केली जाते. मूर्तीची स्थापना केल्यानंतर, दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी आरती करणं आणि नैवेद्य अर्पण करणं शुभ मानलं जातं.

डिस्क्लेमर : हा लेख आचार्य चाणक्य यांच्या नीतीविचारांवरील लोकप्रिय व्याख्या आणि सामान्य जीवनानुभवांवर आधारित आहे. त्यामुळे वैयक्तिक किंवा सामाजिक नात्यांबाबत अंतिम निर्णय घेताना परिस्थितीचा विचार करून स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करावा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?
  • कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद
  • iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!
  • iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!
  • आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in