• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

DMK आमदाराची CM विजय यांना हातपाय तोडण्याची धमकी, आता कोर्टाने म्हटलं काय?

July 23, 2026 by admin Leave a Comment


DMK आमदाराची CM विजय यांना हातपाय तोडण्याची धमकी, आता कोर्टाने म्हटलं काय?

CM C Joseph Vijay threat: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना धमकी दिल्याचे प्रकरण तापले आहे. विलाथिकुलमचे DMK पक्षाचे आमदार जीवी मार्कंडेयन (GV Markandeyan) यांना कोर्टात मोठा झटका बसला. बुधवारी, 22 जुलै रोजी थुथुकुडी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. थुथुकुडीचे न्यायदंडाधिकारी सुमती यांच्यासमोर प्रकरणात सुनावणी झाली. सरकारी पक्षाने थेट मुख्यमंत्र्यांनाच धमकी दिल्याने जामीनाला कडाडून विरोध केला. तर मार्कंडेयन यांच्या वकिलाने दावा केला की, ते गेल्या 11 तासांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची सलग चौकशी करण्यात आलेली आहे. ते लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याची कोणतीही गरज नाही. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन देण्याची विनंती फेटाळली. गेल्या शनिवारी कोविलपट्टी येथील भव्य सभेत मार्कंडेयन यांचा ताबा सुटला आणि त्यांनी मुख्यमंत्री विजय यांचे हातपाय तोडण्याचे वक्तव्य भरसभेत केले. त्यांना तातडीने अटक करण्यात आली.

मार्कंडेयन यांचे प्रक्षोभक भाषण

दाखल एफआयआरनुसार, जाहीर सभेत DMK आमदार मार्कंडेयन यांनी विजय यांचे हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्यांनी प्रक्षोभक भाषण केले. त्यांच्याविरोधात पोलिसांनी BNS कायद्याच्या विविध कलमातंर्गत गुन्हा नोंदवला. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांचा जामीन अर्जाची विनंती फेटाळण्यात आली. मार्कंडेयन यांना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मार्कंडेयन यांची टिप्पणी व्हायरल

धमकीचे महाभारत घडूनही मार्कंडेयन यांच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसला नाही. मुख्यमंत्री विजय यांच्याविषयी त्यांच्या मनातील राग कायम असल्याचे दिसले. पोलिसांच्या गाडीत बसत असताना त्यांनी समर्थकांशी संवाद साधला. तेव्हा, “तुरुंगातील परिस्थिती सध्या चांगली आहे. मी तिथे आनंदात आहे. मला आता पुन्हा जामीन अर्ज करण्याची कोणतीच गरज नाही.” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांची ही प्रतिक्रिया तामिळनाडूमध्ये व्हायरल झाली आहे. त्यांना या सर्व घटनाक्रमाचा कोणताही फरक पडला नसल्याचे दिसून आले.

मार्कंडेयन यांची आमदारकी धोक्यात?

तामिळनाडून विधानसभेचे अध्यक्ष प्रभाकर यांनी या घटनाक्रमावर मत व्यक्त केले. द्रमुकचे आमदार जीवी मार्कंडेयन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर जी टिप्पणी केली, त्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. जर कोणी मार्कंडेयन यांच्याविरोधात माझ्याकडे योग्य आणि लिखित तक्रार केली तर त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे मोठे संकेतही विधानसभा अध्यक्षांनी दिले. यामुळे जीवी मार्कंडेयन यांची आमदारकी धोक्यात आल्याचे मानले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Special Report : एकामागून एक महाआपत्ती… नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?
  • Chitra Wagh : राजकारणात काम करतांना महिलांना अनेक..रितू तावडे, किशोरी पेडणेकरांना भेटल्यानंतर चित्रा वाघ यांचं महत्वाचं विधान
  • रक्षाबंधनावर आधारित हे गाणं ऐकून डोळ्यांत येईल पाणी, चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त
  • थलपती विजय आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, नव्या सर्व्हेमुळे राहुल गांधींची चिंता वाढली, नेमकी आकडेवारी काय
  • सचिनला येतीये सीमा हैदर अन् मुलांची आठवण, रडायला लागला, व्हिडीओमध्ये म्हणाला…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in