• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dharmendra Pradhan Resigns : ‘राजवटीला गुडघे टेकायला भाग पाडलंच…’, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची लक्षवेधी प्रतिक्रिया

July 25, 2026 by admin Leave a Comment


Dharmendra Pradhan Resigns : गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. त्यांच्या मागण्यांपूढे सरकारला झुकावं लागलं आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिल्याची माहिती समोर येताच विद्यार्थ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. एक्सवर एक पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘जंतर मंतर आणि देशभरातील परिस्थितीचा राष्ट्रविरोधी घटकांना फायदा होऊ नये, आपल्या अभ्यासावर, करिअरवर लक्ष केंद्रित करावं, हे सुनिश्चित करण्यासाठी मी पंतप्रधानांना माझी राजीनामा सादर केला आहे’, असं म्हणत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा समोर आल्यानंतर अभिनेते प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रकाश राज यांनी कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांचं अभिनंदन केलं. एवढंच नाही तर, ‘त्या प्रत्येकाचं अभिनंदन ज्यांनी या आंदोलनाचं समर्थन केलं. तुम्ही हे सिद्ध केलं आहे की, तुम्ही एखाद्या राजवटीला गुडघे टेकायला भाग पाडू शकता.’, सध्या प्रकाश राज यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prakash Raj (@joinprakashraj)

प्रकाश राज यांच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स कमेंटचा वर्षाव केला आहे. सांगायचं झालं तर,  सीजेपीचं समर्थन करत प्रकाश राज जंतरमंतर येथे देखील पोहोचले होते. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा देखील साधला… प्रकाश राज दोनवेळा जंतर मंतर येथे पोहोचले होते. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले.

विद्यार्थ्यांचं समर्थन करत प्रकाश राज म्हणाले, ‘आज रात्री मी तुमच्या सोबत आहे… मी येथेच आहे. पाहतो काय होतं ते…’, शिवाय एक व्हिडीओ पोस्ट करत म्हणालेले, ‘आपल्या देशातील तरुण आता प्रश्न विचारत आहे. हे तरुण एकाच उद्देशाने एकत्र आले आहेत आणि लढत आहोत…’, विद्यार्थ्यांच्या या लढ्याला अखेर यश मिळालं आहे.

 

 

 

 

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in