• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dharmendra Pradhan resigns: ..म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा, गेल्या 12 दिवसांमध्ये नेमकं काय -काय घडलं

July 25, 2026 by admin Leave a Comment


सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा आज राजीनामा दिला आहे. कॉकरोच जनता पार्टीची मागणी पूर्ण झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. नीट पेपर फुटीनंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी गेल्या महिन्याभरापासून कॉकरोच जनता पार्टीचं दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू होतं. सुरुवातील या आंदोलनाला फार प्रतिसाद मिळाला नाही. सोनम वांगचूक यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीमधील जंतर मंतरवर वांगचूक यांनी उपोषणाला सुरुवात केली.

दरम्यान त्यानंतर सोनम वांगचूक आणि कॉकरोच जनता पार्टी यांनी वीस जैल रोजी आम्ही संसदेवर मोर्चा काढणार आहोत, असं जाहीर केलं होतं. त्यानंतर 18 जुलै रोजी म्हणजे वांगचूक यांच्या उपोषणाच्या 21 व्या दिवशी साध्या कपड्यामध्ये आलेल्या पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळी हटवून रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यानंतर आंदोलन अधिकच पेटलं.  वीस तारखेला संसदेवर भव्य असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. गर्दीला पांगवण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोड्यात आल्या. या लाठीचार्जचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले. त्यामुळे या आंदोलनाला प्रचंड पाठिंबा वाढला.

दरम्यान शुक्रवारी पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीपूर्वीच अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केलं होतं. जरी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं असलं तरी देखील आंदोलन हे सुरूच राहणार आहे. आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्यांच दिपके यांनी म्हटलं होतं.

दरम्यान त्यानंतर शुक्रवारी कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती, या बैठकीत देखील कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होतं. आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सोडून दुसरं काहीही मंजूर नसल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं होतं. या बैठकीत सरकारने शनिवारी दुपारपर्यंतचा वेळ मागीतला होता, त्यानंतर पुन्हा एकदा  कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारमध्ये बैठक होणार  होती, पंरतु त्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या बारा दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान आणि सरकारवर राजीनाम्यासाठी दबाव चांगलाच वाढला होता, अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in