
नीट परीक्षा गैरव्यवहार, पेपरफुटीच्या मुद्यावरून गेल्या महिन्याभरापासून राजाधानी दिल्लीत आंदोलन पेटलं आहे . शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषम केलं, कॉक्रोच जनता पार्टीनेही राजीनाम्याचा हा मुद्दा लावून धरला. देशभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला, आंदोलन जसंजसं पेटू लागलं तसतसं विरोधक, राजकारणी, अनेक , नेते सेलिब्रिटीही आंदोलकांच्या पाठिशी उभे राहिले आणि सरकारसमोर राजीनाम्याच्या मागणी ने जोर धरला. अखेर अनेक दिवसानंतर सरकार या आंदोलकांसमोर झुकल्याचं चित्र दिसत आहे, कारण शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मी देशातील तरुणांना गोंधळाच्या दुष्टचक्रात अडकू देणार नाही, हा माझा दृढनिश्चय आहे, असं म्हणत प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला असून त्यामुळे आंदोलकांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आतात विविध प्रतिक्रिया समोर येत असून विरोधकांनीही यावर आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उशीरा का होईना राजीनामा झालाय ही आनंदाची बातमी आहे. या नव्या, युवा पिढीचा मला सार्थ अभिमान आणि कौतुक मला वाटतंय, हा लढा त्यांनी जिंकलाय. सरकार जेव्हा त्यांच्याविरोधात होतं, पोलिस लाठीचार्ज करत होते, धमक्या देत होते, यत्याला कशालाही न भिता ज्या पद्धतीने ही पोरं लढली ना, मजा आ गया. मला या युवा पिढीचा खूप अभिमान वाटतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply