• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dharmendra Pradhan Resign : महाराष्ट्रातील हा बडा नेता आता देशाचा शिक्षणमंत्री? थेट पहिलं नाव समोर; आतली माहिती आली!

July 25, 2026 by admin Leave a Comment


Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील तरुण एकवटले होते. काहीही झालं तरी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी भूमिका या आंदोलकांची होती. कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, आता प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रधान यांच्यानंतर शिक्षणमंत्रिपदाचा कारभार कोणाकडे सोपवला जाणार? असे विचारले जात आहे. नव्या नावाची चर्चा केली जात असतानाच आता दिल्लीच्या राजकारणात मोठं नाव असलेल्या एका बड्या नेत्याने एका नेत्याचं नाव घेतलं आहे. विशेष म्हणजे हे नाव महाराष्ट्रातलंच आहे.

12 वर्षामध्ये हे प्रथमच असं आंदोलन झालं

उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तरुणांच्या लढ्याचे हे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची आंदोलकांपुढे न झुकण्याची भाषा होती. पण आता 12 वर्षामध्ये हे प्रथमच असं आंदोलन झालं आहे. याच आंदोलनामुळे केंद्रिय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. सगळा देश यासाठी तरुणाईचे धन्यवाद मानतो, अशा भावना राऊत यांनी व्यक्त केल्या. तसेच, आजच्या दिवसासाठी तरुणाईला रक्त सांडावं लागलं, हाडं मोडून घ्यावी लागली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

उद्याच्या आंदोलनाला आता विजयी रॅलीचे स्वरुप

प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गटाकडून आंदोलन केले जाणार होते. यावरही आता त्यांनी भाष्य केले आहे. दिल्लीच्या आंदोलनात अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली. उद्याच्या आंदोलनाला आता विजयी रॅलीचे स्वरुप आले आहे. पण 20 मुलांना जीव गमवावा लागला त्यामुळे आम्ही जल्लोष साजरा करणार नाही, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं.

नेमकं कोणाला शिक्षणमंत्रिपद मिळणार?

प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यातील घडाडमोडींना वेग आला आहे. यावरही राऊत यांनी भाष्ये केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपद दिले जाऊ सकते, असे भाकित व्यक्त केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल भाई पटेल हे दिल्लीत जात आहेत. मला असे वाटते की धर्मेंद्र प्रधानांच्या जागी फडणवीसांना संधी मिळू शकते. ते शिकलेले आहेत. त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे. तशी चर्चाही सुरु आहे, अशी महत्त्वाची माहिती राऊत यांीद िली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in