
Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताच विरोधकांकडून कॉकरोच जनता पार्टीचे म्हणजेच सीजेपीचे अभिनंदन केले जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून सीजेपीचे दिल्लीच्या जंतर-मंतरच्या मैदानावर आंदोलन सुरू होते. नीट पेपरफुटीमुळे झालेल्या घोटाळ्यासाठी धर्मेंद्र प्रधान हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणी सीजेपीची होती.
NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसंच, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply