• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dharmendra Pradhan: नारीशक्तीच्या प्रेरणादायी गोष्टी… भारावले केंद्रीय शिक्षणमंत्री… धर्मेंद्र प्रधान यांची ती मोठी घोषणा

June 14, 2026 by admin Leave a Comment


Dharmendra Pradhan: आत्मनिर्भर महिला सन्मान कार्यक्रमात महिलांच्या यशोगाथा ऐकताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हरकून केले. भोपाळमध्ये या आत्मनिर्भर महिलांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची त्यांनी माहिती घेतली. महिलांचे कष्ट, कौशल्य आणि आत्मविश्वसाचे, त्यांच्या प्रतिभेचे त्यांनी कौतुक केले. देशातील नारीशक्ती नवोपक्रम आणि स्वतःच्या पायावर नवीन ओळख निर्माण करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तर त्याचवेळी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या महिलांसाठी शिक्षणाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यांच्या या पुढाकाराने देशभरातील महिलांना आता शिक्षणाचे खुले व्यासपीठ मिळणार आहे.

केंद्र सरकार महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध

यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील महिला सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर होत असल्याचे वक्तव्य केले. महिलांना सक्षम, आत्मनिर्भर आणि सशक्त करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले. लखपती दीदी उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी महिला स्वयंसोरजागारसोबतच शिक्षण, कौशल्य विकास आणि स्टार्टअपच्या जगात महिला प्रगतीचा झेंडा रोवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महिलांना शिक्षणाची मोठी संधी

तर उच्च शिक्षणात नवीन ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा त्यांनी गौरव केला. पीएचडी आणि डबल आयटीआय सारख्या उपक्रमांमध्ये हिरारीने सहभागी झालेल्या महिलांचे त्यांनी कौतुक केला. निर्माल्याचा पुनर्वापर करत त्यापासून नवीन उत्पादने बाजारात आणण्याच्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. त्यामुळे मंदिर परिसरात स्वच्छता तर राहतेच पण अनेकांच्या हातांना रोजगार मिळतो. महिला आत्मनिर्भर होत आहेत. नवोउपक्रमाच्या माध्यमातून सर्जनशील होत असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या गोवर्धन आणि लखपती दीदी योजनेविषयी त्यांनी माहिती दिली.

आज भोपाल में ‘आत्मनिर्भर महिला सम्मान’ कार्यक्रम में आत्मनिर्भर नारी शक्ति एवं @BMCBhopal के नवनिर्मित मुख्यालय ‘अटल भवन’ में नगर निगम पार्षदों से संवाद करने का अवसर मिला। इस अवसर पर भोपाल से लोकसभा सांसद श्री @Alok_SharmaBJP जी, भोपाल दक्षिण-पश्चिम से विधायक श्री @BDSabnani जी,… pic.twitter.com/WX5C2jwoMU

— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) June 13, 2026

आत्मनिर्भर आणि कर्तृत्वान महिलांसाठी शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या अधिक संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यीपाठाच्या IGNOU च्या सहकार्याने नवीन अभ्यासक्रम आणि उपक्रम राबविण्याची मोठी घोषणा त्यांनी केली. तर IIM सारख्या बड्या प्रतिष्ठित संस्था सुद्धा या उपक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न होईल असा दावा त्यांनी केला. यामुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होता तर येईलच. पण त्यांच्या कर्तृत्वाचा शिक्का आता मोठ्या मंचावरही उमटेल. त्यांना अधिक चांगल्या संधी मिळतील.

भोपाळ या शहराला स्वच्छ, सुंदर आणि आत्मनिर्भर करण्यासाठी नारीशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रधान म्हणाले. आगामी काळात PNG (पाइप्ड नॅचरल गॅस) वापराला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि चांगली जीवनशैलीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in