• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dahi Handi 2026 : आतापर्यंत कुठल्या पथकांनी लावले 9 थर, कुठे झाला महिलेचा मृत्यू? जाणून घ्या

September 5, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील विविध भागात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह अधिक पाहायला मिळत आहे. हजारो गोविंदा पथक हे दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक गोविंदा पथक 11 थर लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर काही पथकांनी 9 थर लावण्याचा देखील विक्रम केला. दहीहंडी फोडण्यासाठी आयोजकांनी लाखोंचं बक्षीस जाहीर केलं आहे. तर पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान एक दुर्घटना देखील घडली आहे.

मुंबईठाण्यात यंदा जय जवान गोविंदा पथक यावर्षी ११ थर लावण्याचा प्रयत्न करणार आहे.  गेल्यावर्षी तीन ठिकाणी १० थर लावण्याचा विक्रम जय जवानने केला होता. तर अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथकाकडून घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात ९ थरांची सलामी देण्यात आली आहे. साई राम गोविंदा पथकाने (जोगेश्वरी) ८ थरांची सलामी दिली. त्यानं श्री साई सावली गोविंदा पथक नालासोपारा यांनी यशस्वीपणे ८ थर लावले. एमएमआरडीए गोविंदा पथकाने ८ थर लावले.

मुंबई,ठाण्यात यंदा जय जवान गोविंदा पथक यावर्षी ११ थर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्यावर्षी तीन ठिकाणी १० थर लावण्याचा विक्रम जय जवानने केला होता. तर अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथकाकडून घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात ९ थरांची सलामी देण्यात आली आहे. साई राम गोविंदा पथकाने (जोगेश्वरी) ८ थरांची सलामी दिली. त्यानं श्री साई सावली गोविंदा पथक नालासोपारा यांनी यशस्वीपणे ८ थर लावले. एमएमआरडीए गोविंदा पथकाने ८ थर लावले.

पिंपरी चिंचवडच्या जुन्या सांगवीत दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सलमा सलाउद्दीन पठाण असं मृत महिलेचं नाव आहे. रात्री विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं. यावेळी अचानक लोखंडी भाग सलमा यांच्या डोक्यावर पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पिंपरी चिंचवडच्या जुन्या सांगवीत दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सलमा सलाउद्दीन पठाण असं मृत महिलेचं नाव आहे. रात्री विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं. यावेळी अचानक लोखंडी भाग सलमा यांच्या डोक्यावर पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

प्रताप सरनाईक आणि पूर्वीच सरनाईक आयोजित संस्कृती दहीहंडीला कांदिवलीच्या जय श्री महाकाल गोविंद पथकाने यशस्वी ८  थरांची सलामी दिली.  सलग तिसऱ्या वर्षी संस्कृती दहीहंडीला ८ थरांची सलामी दिली.

प्रताप सरनाईक आणि पूर्वीच सरनाईक आयोजित संस्कृती दहीहंडीला कांदिवलीच्या जय श्री महाकाल गोविंद पथकाने यशस्वी ८ थरांची सलामी दिली. सलग तिसऱ्या वर्षी संस्कृती दहीहंडीला ८ थरांची सलामी दिली.

 शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात आमदार संजय केळकर यांनी श्रीफळ वाढवून गोपाळकाला आणि  दहीहंडीला सुरुवात केली. या प्रसंगी ठाणे व संपूर्ण महाराष्ट्र नशामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शहरातील हुक्का पार्लरवर धडक कारवाई करून ते बंद करण्यात आले असून उरलेले अवैध धंदेही पूर्णपणे मोडीत काढले जातील. ठाण्याला संपूर्णपणे 'ड्रग फ्री' बनवण्याचा ठाम संकल्प केला असल्याचा आमदार संजय केळकर यांनी यावेळी बोलून दाखवले.

शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात आमदार संजय केळकर यांनी श्रीफळ वाढवून गोपाळकाला आणि दहीहंडीला सुरुवात केली. या प्रसंगी ठाणे व संपूर्ण महाराष्ट्र नशामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शहरातील हुक्का पार्लरवर धडक कारवाई करून ते बंद करण्यात आले असून, उरलेले अवैध धंदेही पूर्णपणे मोडीत काढले जातील. ठाण्याला संपूर्णपणे 'ड्रग फ्री' बनवण्याचा ठाम संकल्प केला असल्याचा आमदार संजय केळकर यांनी यावेळी बोलून दाखवले.

ठाणे मध्यवर्ती असलेल्या शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात बाळगोपाळांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अनेक सिनेअभिनेते व अभिनेत्री या दहीहंडी उत्सवाला भेट देणार आहेत.

ठाणे मध्यवर्ती असलेल्या शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात बाळगोपाळांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अनेक सिनेअभिनेते व अभिनेत्री या दहीहंडी उत्सवाला भेट देणार आहेत.

पुण्याच्या हांडेवाडी येथील श्रीराम चौकात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगीरे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं.  ढोल पथकं साऊंड सिस्टिम आकर्षक विद्युत रोषणाई हे दहीहंडीचं खास आकर्षण आहे. हंडी फोडणाऱ्या दहीहंडी पथकाला 717171 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

पुण्याच्या हांडेवाडी येथील श्रीराम चौकात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगीरे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. ढोल पथकं, साऊंड सिस्टिम, आकर्षक विद्युत रोषणाई हे दहीहंडीचं खास आकर्षण आहे. हंडी फोडणाऱ्या दहीहंडी पथकाला 7,17,171 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात यंदा महिला गोविंदा पथकांनी जास्त उपस्थिती लावली आहे. यंदा महिलांना भरघोस बक्षिसे देणायत येणार आहे. नशामुक्त भारत अभियान हे नरेंद्र मोदी यांचं आहे. त्या अनुषंगाने नशामुक्त धोरण प्रचार करत हंडी उत्सव आयोजित केला आहे.

शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात यंदा महिला गोविंदा पथकांनी जास्त उपस्थिती लावली आहे. यंदा महिलांना भरघोस बक्षिसे देणायत येणार आहे. नशामुक्त भारत अभियान हे नरेंद्र मोदी यांचं आहे. त्या अनुषंगाने नशामुक्त धोरण प्रचार करत हंडी उत्सव आयोजित केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6, 6, 6, 6, 6… आणि 100! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाच्या रडारवर दोन विश्वविक्रम
  • Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
  • टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
  • weather update : 24 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, आयएमडीचा हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
  • जरांगेंनी उपचार, पाणी सोडले… विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, मला धक्का…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in