• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

D Mart : डी मार्ट बिलाचे पैसे कसे द्याचये? कार्ड स्वॅप करावं की कॅश द्यावी? 99 टक्के लोकांना ही ट्रीक माहितच नसते

July 19, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही वर्षांमध्ये मध्यम वर्गात डी मार्टची क्रेझ चांगलीच वाढल्याचं पहायला मिळत आहे. अगदी आपल्याला काही किरकोळ वस्तू देखील खरेदी करायच्या असतील तरी देखील आपण त्या डी मार्टमधूनच खरेदी करतो, तसेच आपल्याला दर महिन्याला जो किराणा लागतो, तो देखील आपण आता डी मार्डमधूनच खरेदी करतो. डी मार्ट मधून शॉपिंग करण्याचे काही फायदे आहेत, तसेच काही तोटे देखील आहेत. फायद्याबाबत बोलायचं झाल्यास आपल्याला सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होतात, अगदी किराणा मालापासून ते कपड्यांपर्यंत आणि दैनंदिन लागणाऱ्या गोष्टींपर्यंत सर्व वस्तू या डी मार्टमध्ये उपलब्ध असतात, त्यामुळे आपल्याला वस्तू खोरदीसाठी फार धावपळ करावी लागत नाही.

तसेच आपल्याला डी मार्टमध्ये एकाच वस्तूचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. एकाच वस्तूचे विविध ब्रॅन्ड आपल्याला उपलब्ध होत असल्याने आपल्याला हवी ती वस्तू आपल्या आपल्या हाताने खरेदी करू शकतो. तसेच अनेक वस्तूंवर डी मार्टमध्ये मोठी सूट देखील देण्यात आलेली असते, त्यामुळे बऱ्याचवेळा बिलात देखील मोठी बचत होते, हे झाले डी मार्टचे फायदे. परंतु डी मार्टमधून वस्तू खरेदी करण्याचे काही तोटे देखील आहेत.

तोटा असा की डी मार्टमध्ये विक्रीसाठी अनेक वस्तू उपलब्ध असल्यामुळे आपण खरेदीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. अनेकदा आपल्याला गरज नसलेल्या वस्तू देखील आपण खरेदी करतो, त्यामुळे बिलात मोठी वाढ होते. त्यामुळे आपलं बजेट बिघडण्याची शक्यता असते.

आपण डी मार्टचं बिल सामान्यपणे दोन पद्धतीने पे करतो, एक तर कार्ड स्वॅप करतो किंवा कॅश देतो. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की बिल पे करताना कॅश द्यावी की कार्ड स्वॅप करावं?  काय फायद्याचं ठरू शकतं, तर तुम्ही बिल पे करताना शक्यतो कॅशचं द्यावी, कारण त्यामुळे सुरक्षित आर्थिक व्यवहार होतो. तुम्ही जर बिलासाठी कार्ड स्वॅप केलं तर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुमचा कार्डचा डेटा हा शेअर होत असल्यामुळे तुमच्यासोबत भविष्यात आर्थिक फ्रॉड सारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे डी मार्टचं नाही तर शक्यतो गर्दीच्या सर्व ठिकाणी आर्थिक व्यवहार हे कॅशच्या माध्यमातूनच करावेत, असं या क्षेत्रातील तज्ज्ञ संगातात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाळासाहेबांचं नाव वापरून कोट्यवधींचा… प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप
  • भारत बांगलादेशच्या संबंधांवर थेट परिणाम, पुन्हा बांगलादेशने तेच केले, पाकिस्तानच्या नादाला लागून..
  • BCCI Rule: रोहित-विराटला खटकलं अन् बीसीसीआयने नियमच बदलला, 10 संघांना तातडीने आदेश दिला
  • Pratap Sarnaik : मंत्री प्रताप सरनाईक-नरेंद्र मेहता वाद पेटला; थेट राजीनाम्यावर प्रकरण पोहोचलं, कोण काय म्हणालं?
  • प्रचंड रोमँटिक गाणं, 100 वेळा ऐकूनही भरत नाही मन, 36 वर्षांपासून प्रेक्षकांचं प्रचंड आवडीचं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in