
मिरा-भाईंदरच्या राजकारणात कलादालन प्रकल्पाच्या खर्चावरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे नेते नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करून कथित गैरव्यवहार झाल्याचा दावा मेहता यांनी केला आहे.
मेहता यांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेने सुरुवातीला 39 कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. मात्र, या प्रकल्पाचा खर्च टप्प्याटप्प्याने वाढत अखेरीस 160 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. 39 कोटींवरून 50 कोटी, त्यानंतर 70, 100, 120 आणि अखेरीस 160 कोटी रुपये असा खर्च वाढल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रश्न उपस्थित करत नरेंद्र मेहता म्हणाले, “39 कोटींचे कलादालन 160 कोटींवर कसे गेले?” तसेच, “जर चांदीचे पत्रे लावले असते तरी एवढा खर्च आला नसता,” असेही ते म्हणाले.
या प्रकरणात महानगरपालिकेच्या टेंडर प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावावर झालेला जीवंत भ्रष्टाचार” असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांकडे तातडीने Third-Party Audit करण्याची मागणी नरेंद्र मेहता यांनी केली आहे.
Leave a Reply