• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cyclone Dolphin : चक्रीवादळाचं रौद्र रूप, तब्बल 198 किमी प्रति तास वेगाने मोठं संकट, 500 विमानांची उड्डाण रद्द, अति मुसळधार पाऊस

August 7, 2026 by admin Leave a Comment


पूर्व आशियामध्ये पुन्हा एकदा विध्वंसक चक्रीवादळ आलं आहे. भारताचं मित्र राष्ट्र असलेल्या जपानला गेल्याच आठवड्यात भूकंपाचे धक्के बसले होते. या नैसर्गिक आपत्तीमधून अजूनही जपान पूर्णपणे सावरलेलं नाहीये, तोच आता जपानच्या दारावर आणखी एक मोठं संकट येऊन धडकलं आहे. शुक्रवारी ‘डॉल्फिन’ नावाचं चक्रीवादळ जपानच्या ओकिनावा परिसरात धडकलं, या चक्रीवादळामुळे या परिसराचं प्रचंड नुकसान झालं आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या चक्रीवादळामुळे या भागात सध्या तब्लल 198 किमी प्रति तास वेगाने वारे वाहत आहे. या चक्रीवादळामुळे अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच समुद्रात प्रचंड उचींच्या लाटा उसळत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील नागरिकांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

डॉल्फिन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या हवामान विभागाकडून ओकिनावा आणि कागोशिमा प्रांतातील जवळपास अडीच लाख लोकांना आपलं घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी आहे, त्या परिस्थितीमध्ये आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जावे, कोणीही या परिसरात राहू नये, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. दरम्यान ज्या नागरिकांनी आपल्या घरातून स्थलांतर केलं आहे. त्यांच्या निवाऱ्यासाठी जपान सरकारकडून तात्पुरत्या स्वरुपात निवारा उभारण्यात आला आहे. भूकंपानंतर आता हे आणखी एक मोठं संकट जपानवर आलं आहे.

काम ठप्प

दरम्यान चक्रीवादळ डॉल्फिनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारने ओकिनावा आणि कागोशिमा प्रांतातील सर्व कारखान्यांना काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येनी या दोन प्रदेशामधून स्थलांतर केलं आहे. ‘डॉल्फिन’ चक्रीवादळामुळे जपान सरकारने तब्बल 500 विमानांची उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच या रस्ते वाहतुकीला देखील या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांकडून नागरिकांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत
  • हॉटेलमध्ये भेटू, तू चांगली दिसतेस; ग्राम महसूल अधिकाऱ्याचे भयंकर कृत्य; डर्टी WhatsApp चॅट समोर
  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in