• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CWG 2026: मी नसलो तरी, आता…! कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर नीरज चोप्राने केलं मोठं विधान

August 1, 2026 by admin Leave a Comment

ग्लासगो येथे कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत 23 पदकांची कमाई केली असून शेवटच्या दोन दिवसात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीपासून भालाफेकपटू नीरज चोप्राच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. त्याने अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरी गाठली आणि सिल्व्हर पदक पटकावलं. विशेष म्हणजे अंतिम फेरीत भारताच्या तीन खेळाडूंनी जागा मिळावली होती. त्यापैकी नीरज चोप्राने सिल्व्हर आणि यशवीर सिंगने कांस्य पदक पटकावलं. तर रोहित यादवनेही पदकासाठी चांगला प्रयत्न केला. पण पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेच्या इतिहासात गोल्ड आणि सिल्व्हर पदक मिळवणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे. या कामगिरीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने आपलं मत व्यक्त केलं आहे.

भालाफेकपटू नीरज चोप्रा म्हणाला की…

भालाफेकपटू नीरज चोप्रा सिल्व्हर पदक पटकल्यावनंतर म्हणाला की, ‘आज आशियाई खेळाच्या आठवणी ताज्या झाल्या, तेव्हा मी आणि किशोर कुमार जेना याने पदक जिंकलं होतं. मला आनंद आहे की, यशवीरने मोक्याच्या क्षणी आपला वैयक्तिक बेस्ट थ्रो केला. एकत्र पोडियमवर उभे राहणे ही एक अद्भुत भावना आहे. मी सुद्धा या हंगामात माझी सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि माझे पुनरागमन योग्य दिशेने वाटचाल करत आहे, पुढे अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. सर्वात मोठा आनंद हा आहे की, जरी मी मैदानावर नसलो किंवा जखमी असलो तरी, आपल्याकडे अजूनही चांगले भालाफेकपटू आहेत. यशवीरने आता 85 मीटर क्लबमध्ये प्रवेश केला आहे आणि रोहितही चांगली कामगिरी करत आहे. देशात भालाफेकीमध्ये इतकी प्रतिभा उदयास येत आहे हे पाहून खूप आनंद होतो.’

बेस्ट थ्रो करण्यापासून चुकलो, पण…

ग्लासगोमधील कामगिरीनंतर नीरज चोप्रा म्हणाला की, ‘आजच्या स्पर्धेत माझा फक्त एकच थ्रो चांगला झाला. बाकीचे थ्रो अधिक चांगले होऊ शकले असते. पण मला थंड वातावरणाता चांगली कामगिरी करणं अवघड जातं. मला उबदार हवामान अधिक पसंत आहे.’ नीरज चोप्राने सहा प्रयत्नांपैकी दुसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. पहिला थ्रो 80.97 मीटर, दुसरा थ्रो 85.83 मीटर, तिसरा थ्रो 81.29 मीटर आणि चौथा थ्रो 80.73 मीटर इतका लांब होता. तर पाचवा आणि सहावा थ्रो फाउल ठरला. नीरज चोप्रा आता 2026 मध्ये होणाऱ्या आगामी आशियाई खेळांपूर्वी डायमंड लीगमध्ये सहभागी होताना दिसू शकतो.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in