• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CWG 2026: बॉक्सर अंकुश पंघाल आणि प्रीति पवार मारणार गोल्डन पंच, सामन्याबाबत जाणून घ्या सविस्तर

July 31, 2026 by admin Leave a Comment


कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेचे शेवटचे दोन दिवस उरले असून 2 ऑगस्टला सांगता होणार आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 17 मेडल मिळवले असून पदकतालिकेत 10 व्या स्थानावर आहे. भारताने 3 गोल्ड, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदक मिळवले आहे. या पदकांमध्ये आणखी दोन सुवर्ण पदक येऊ शकतात. कारण भारतीय बॉक्सर्सनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय महिला बॉक्सर प्रीति पवार हिने 54 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत प्रीति पवार जाम्बियाच्या कॅथरील मवापेला 5-0 ने एकतर्फी पराभूत केलं.

प्रीति पवारने कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठल्याने तिचं रौप्य पदक निश्चित झालं आहे. पण प्रीतिकडून गोल्डन पंचची अपेक्षा आहे. आता अंतिम फेरीत प्रीतिचा सामना कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडो याच्याशी होणार आहे. प्रीति पवार हरियाणातील भिवानीची रहिवासी असून अवघ्या 22 वर्षांची असून पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत सहभागी झाली आहे. प्रीती पवारला कधीच बॉक्सर व्हायचे नव्हते. तिला बॉक्सिंगमध्ये अजिबात रस नव्हता. तिचे काका विनोद पवार हे माजी राष्ट्रीय बॉक्सर आणि तिचे प्रशिक्षकही आहेत. त्यांनीच प्रीतला बॉक्सर बनण्याची प्रेरणा दिली. आता गोल्ड मेडलपासून एक विजय दूर आहे.

प्रीती पवार (महिला 54 किलो वजन गट)सामना

    • सुवर्णपदक लढत प्रतिस्पर्धी: स्कार्लेट डेलगाडो (कॅनडा)
    • तारीख: 1 ऑगस्ट 2026 (शनिवार)
    • वेळ: दुपारी 3.30 वाजता (भारतीय वेळेनुसार)

Preeti Pawar storms into the Women’s 54kg Final with a dominant 5-0 victory at Glasgow 2026.⚡

Watch her fight for Gold on 1 August at 3:30 PM, LIVE & EXCLUSIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #Glasgow2026 #GlasgowMeinTiranga… pic.twitter.com/LnBmSYqXSH

— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 31, 2026

कॉमनवेल्थ स्पर्धेत 80 किलो वजनी गटातील बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत अंकुश पंघालने एन्ट्री मारली आहे. त्यामुळे गोल्ड मेडलपासून एक विजय दूर आहे. उपांत्य फेरीत अंकुश पंघालने कॅनडाच्या जोशुआला 5-0 ने पराभूत केलं. खरं तर अंकुश पंघाल तीन वर्षे कबड्डी खेळत होता. पण वडिलांच्या सांगण्यावरून त्याने कबड्डी सोडली आणि बॉक्सिंग खेळण्यास सुरूवात केली. अंकुश फक्त 21 वर्षांचा असून या खेळाडूने 2023 मध्ये झालेल्या एएसबीसी युवा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

Ankush will go for gold. He beats Canada’s Joshua Ofori by a wide 5-0 unanimous decision in the semis of the men’s 80kg category at the Glasgow Commonwealth Games. pic.twitter.com/Co2sQZd2p6

— jonathan selvaraj (@jon_selvaraj) July 31, 2026

अंकुश पंघाल (पुरुष 80 किलो वजन गट)सामना

  • सुवर्णपदक लढत
  • तारीख: 1 ऑगस्ट 2026 (शनिवार)
  • वेळ: रात्री 10.15 वाजता (भारतीय वेळेनुसार)





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in