• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cricket : बुधवारी रंगणार 7 सामन्यांचा थरार, टीम इंडियाचे 3 मॅचेस, जाणून घ्या

June 16, 2026 by admin Leave a Comment


क्रिकेट चाहत्यांना बुधवारी 17 जून रोजी तब्बल 7 सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. या 7 पैकी टीम इंडियाचे 3 सामने असणार आहे. वुमन्स, मेन्स आणि इंडिया ए भारताचे असे 3 संघ एक्शन मोडमध्ये असणार आहेत. तसेच इतर सामन्यांबाबतही जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

India A Team Vaibhav Sooryavanshi

बुधवारी इंडिया ए टीमचा पहिला सामना असणार आहे. भारतासमोर ट्राय सीरिजमधील या सामन्यात अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे. या सामन्याला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. (Photo Credit : PTI)

India vs Afghanistan Odi Series 2026

त्यानंतर दुपारी दीड वाजता सिनिअर टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील या दुसऱ्या सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. (Photo Credit : PTI)

Smriti Mandhana and Harmanpreet Kaur

वुमन्स टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपला दुसरा सामना खेळणार आहे. वुमन्स टीम इंडिया या सामन्यात नेदरलँड्स विरुद्ध 2 हात करणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. (Photo Credit : PTI)

BAN vs AUS T20i Series 2026

वुमन्स टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत दुपारी 3 वाजता ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश अशी लढत होणार आहे. तर रात्री 11 वाजता पाकिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. तर रात्री दीड वाजता बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी 20I सामना होणार आहे. (Photo Credit : PTI)

Joe Root England Captain

तर 17 जूनपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. (Photo Credit : GETTY IMAGES)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच…
  • इच्छा तिथे मार्ग..मजुरी केली, घरं रंगवली, आज 100 कोटीपेक्षा जास्त रक्कमेला ट्रान्सफर, कोण आहे हा घानाचा यशस्वी फुटबॉलपटू?
  • Success Story : 19 वर्षांचा मुलगा कमवतो महिन्याला 1 कोटी, आयुष सिंह नेमकं करतो तरी काय?
  • 47 वर्षांपूर्वीची हॉरर फिल्म… आज पाहून येईल हसू, 1 कोटीच्या बजेटमध्ये कमावले 9 कोटी
  • निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in