• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cricket : आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूवर 1 वर्षाची बंदी, क्रिकेट बोर्डाचा निर्णय, कारण?

April 20, 2026 by admin Leave a Comment


आतापर्यंत अनेक खेळाडूंनी पीएसएलऐवजी (PSL) आयपीएल स्पर्धेत खेळण्यास प्राधान्य दिलंय. खेळाडूंनी करारानंतरही पीएसएलमधून फक्त नि फक्त आयपीएलसाठी माघार घेतलीय. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माघार घेणाऱ्या खेळाडूंवर बंदीची कारवाई केली आहे. त्यात आता आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. पीसीबीने श्रीलंकेच्या दासुन शनाका याच्यावर 1 वर्षाची बंदीची कारवाई केली आहे. (Photo Credit : PTI)

Dasun Shanaka Sri Lanka

पीएसएलसाठी दासुन शनाका आणि लाहोर कलंदर्स यांच्यात करार झाला होता. मात्र दासूनने हा करार मोडला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दासूनवर 1 वर्षासाठी बंदीची कारवाई करण्यात येत असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे दासूनला पीएसएलच्या पुढील हंगामात खेळता येणार नाही. (Photo Credit : PTI)

Dasun Shanaka and Fakhar Zaman

दासून शनाका करार मोडल्यानंतर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स टीमसह जोडला गेला आहे. ऑलराउंडर सॅम करन याला बाहेर व्हावं लागल्याने त्याच्या जागी दासुनला संधी देण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)

Pathum Nissanka and Dasun Shanaka

राजस्थान रॉयल्सने दासुन शनाका याच्यासाठी 2 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मात्र दासूनला अजूनही खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे दासून संधीच्या प्रतिक्षेत आहे. (Photo Credit : PTI)

Dasun Shanaka Sri Lanka Cricketer

पीसीबीकडून बंदीची कारवाई होणारा दासून दुसरा खेळाडू ठरला आहे. पीसीबीने दासूनआधी झिंबाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी याच्यावर बंदी घातली. ब्लेसिंगनेही पीएसएलमधून माघार घेत आयपीएलमध्ये केकेआर टीमसह जोडला गेला. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उंदीर घरात यायला घाबरेल, शून्य रुपये खर्च लागणाऱ्या या ट्रिक वापरा, चमत्कार पाहा!
  • टाटा सिएरा ते निसान टेक्टॉन, पाहा 2026 मध्ये लाँच होणाऱ्या टॉप गाड्या
  • शेवग्याच्या शेंगांची साल पोषक तत्वांचा खजिना, आहारात अशा प्रकारे समावेश करा आणि जाणून घ्या ‘हे’ जबरदस्त फायदे
  • Cricket : आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूवर 1 वर्षाची बंदी, क्रिकेट बोर्डाचा निर्णय, कारण?
  • Airtel कडून ग्राहकांना मोठा धक्का, या प्लॅनच्या किंमतीत 40 रुपयांची वाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in