• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शेवग्याच्या शेंगांची साल पोषक तत्वांचा खजिना, आहारात अशा प्रकारे समावेश करा आणि जाणून घ्या ‘हे’ जबरदस्त फायदे

April 20, 2026 by admin Leave a Comment


शेंवगाच्या शेंगांमध्ये अनेक पोषक घटक, औषधी गुणधर्म असतात, जे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. एवढेच नाही तर दक्षिण भारतात विशेषतः सांबारमध्ये शेवग्याच्या शेंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. पण याव्यतिरिक्त आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत शरीर आतून तंदूरस्त राहावे यासाठी शेवगाच्या पानांच्या पावडरीचा आहारात समावेश केला जातोय. तर शेवग्याच्या शेंगांचा वापर भाजीच्या आमटीपासून ते सूप आणि पराठ्यापर्यंत अनेक पदार्थांमध्ये केला जातो. जेव्हा आपण शेवगाच्या शेंगांपासून पदार्थ बनवतो तेव्हा शेंग्याची सालं सोलून अनेकदा फेकून देतो. पण या सालींमध्येही अनेक गुणधर्म असतात, त्यामुळे त्या फेकून देण्याऐवजी तुम्ही त्या साठवून अनेक कामांसाठी वापरू शकता.

शेवग्याच्या शेंगांची सालं तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते त्वचा उजळ करण्यापर्यंत आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी उपयुक्त ठरू शकतात. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात आणि वजन नियंत्रणातही मदत करतात. चला तर मग जाणून घेऊयात की तुम्ही शेवग्याच्या शेंगांच्या सालींचा वेगवेगळ्या प्रकारे कसा वापर करू शकता.

शेवग्याच्या सालीची पावडर बनवा

शेवग्याच्या शेंगांची साल काढा आणि स्वच्छ धुवा आणि नंतर कडक उन्हात सुकवा. शेंगा पूर्णपणे सुकल्यावर मिक्सर ग्राइंडरमध्ये त्यांची पूड करा. आता तुम्ही या पावडरचा वापर सूप, डाळ, स्मूदी इत्यादींमध्ये करू शकता. यामुळे या सर्व पदार्थांमध्ये अतिरिक्त पोषक तत्वे मिळतील.

शेवग्याच्या सालीच्या पावडरपासून आरोग्यदायी चहा बनवा

तयार शेवग्याच्या सालीची पावडर पाण्यात उकळवा. ते गाळून हर्बल चहाप्रमाणे प्या. त्यात दालचिनीची काडी टाका. हा चहा तुमची प्रतिकारशक्ती वाढवेल, वजन नियंत्रणात मदत करेल आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून त्वचेला चमक देईल. कारण या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, लोह आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

शेवग्याची पावडर तुमचा चेहऱ्यासाठी उत्तम

शेवग्याच्या सालीची पावडर दह्यामध्ये मिक्स करा. त्यात थोडे मध टाकून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. कमीतकमी 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. हा फेस पॅक मुरुमे आणि डाग कमी करण्यास मदत करतो. तसेच, तो त्वचेच्या मृत पेशी देखील काढून टाकतो.

वनस्पतीसाठी उत्तम खत बनवा

तुम्ही शेवग्याच्या सालींपासून खत देखील बनवू शकता. यासाठी, एका भांड्यात मातीचा थर पसरा. त्यावर साली ठेवा, आणि पुन्हा त्यावर माती टाका. इतर फळं आणि भाज्यांच्या साली टाकत राहा आणि मातीचे थर रचत राहा. यामुळे एक उत्तम सेंद्रिय खत तयार होईल, जे तुमच्या रोपांना हिरवेगार ठेवेल.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उंदीर घरात यायला घाबरेल, शून्य रुपये खर्च लागणाऱ्या या ट्रिक वापरा, चमत्कार पाहा!
  • टाटा सिएरा ते निसान टेक्टॉन, पाहा 2026 मध्ये लाँच होणाऱ्या टॉप गाड्या
  • शेवग्याच्या शेंगांची साल पोषक तत्वांचा खजिना, आहारात अशा प्रकारे समावेश करा आणि जाणून घ्या ‘हे’ जबरदस्त फायदे
  • Cricket : आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूवर 1 वर्षाची बंदी, क्रिकेट बोर्डाचा निर्णय, कारण?
  • Airtel कडून ग्राहकांना मोठा धक्का, या प्लॅनच्या किंमतीत 40 रुपयांची वाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in