• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

June 23, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील कोस्टल रोडवर झालेल्या अपघातामुळे आज सकाळपासुनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वरळी, हाजी अली ते नरिमन पॉईंट या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोस्टल रोडवर एका वाहनाचा अपघात झाला असून त्यानंतर वाहतुकीचा वेग मंदावला. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेमुळे संपूर्ण मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

वाहतूक कोंडीमुळे कार्यालयीन वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांचा मोठा खोळंबा झाला असून अनेक वाहनचालकांना रस्त्यातच थांबावे लागत आहे. परिणामी, प्रवाशांना वेळेचा फटका बसत आहे.

दरम्यान, प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!
  • हवेच्या वेगाने पाणी आलं अन् सर्वच वाहून नेलं… पावसाचा थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये जलप्रलय Video
  • Viral Video : मांजरीला वाचवायला गेली दोन छोटी मुलं, काय घडलं बघा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in