• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CNG Price Hiked : महागाईचा दणका, पेट्रोल आणि डिझेलनंतर सीएनजीमध्येही वाढ, थेट..

May 24, 2026 by admin Leave a Comment


मध्य पूर्वेत मोठे संकट आहे. ज्याचा जगावर परिणाम होतोय. या युद्धाचे परिणाम भारतात बघायला मिळत आहे. सरकारकडून दहा दिवसातच तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. जागतिक बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत. आज सकाळीच मोठा दणका लोकांना बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. 23 मे 2026 रोजी सर्वात अगोदर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढ करण्यात आली. त्यानंतर आता सीएनजीच्याही किमतीत वाढ करण्यात आली. कुठेच दिलासा नसल्याचे यावरून दिसत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर नाहीत, या किमती स्थिर नसल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. शिवाय होर्मुज खाडी बंद असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली.

आज अगोदर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. त्यानंतर सीएनजीच्याही किमतीत वाढ झाली. सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयाने वाढ झाली आहे. काल 22 मे 2026 रोजी सीएनजीचा दर 80.09 पैसे होता, आज तो 81.09 पैसे झाला आहे. जर इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष असाच कायम राहिला तर अजून मोठ्या प्रमाणात इंधनामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 87 पैशांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 91 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांतील इंधन दरवाढीची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 3 रुपयांनी मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 19 मे रोजी दरात प्रति लिटर सुमारे 90 पैशांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल सुमारे 25 रुपयांनी महाग झाले आहे.

सीएनजीदेखील सुमारे 4 रुपयांनी महाग झाला आहे. आता या दरवाढीमुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. कोणत्याही स्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध थांबले पाहिजे, जर हे युद्ध थांबले नाही तर स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. फक्त भारतच नाही तर जगही संकटात आहे. त्यामध्येच डॉलरच्या किमतीमध्ये वाढ होत असून रूपयां घसरताना दिसतोय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in