• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य

September 8, 2026 by admin Leave a Comment


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी सरकारची भूमिका मांडली. मराठा समाजाला न्याय देण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले.

ते म्हणाले की, आजपर्यंत मराठा समाजाला जे काही दिले आहे, ते आम्हीच दिले आहे. हे केवळ कागदावरचे निर्णय नसून, त्याचा प्रत्यक्ष फायदा मराठा समाजाला झालेला आहे. संविधानात जे काही नमूद आहे, ते निश्चितपणे मराठा समाजाला मिळेल याची ग्वाही त्यांनी दिली. कोणा एका समाजाला दुखावून दुसऱ्याला फायदा देण्याचा विचार सरकार करणार नाही, असे संकेत त्यांनी दिले.

मराठा समाज असो किंवा इतर कोणताही समाज असो, सगळ्यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. मराठा समाजाला न्याय देणार आहोत आणि त्या संदर्भात चर्चा झालेली आहे. सर्व शक्य ते आम्ही करू आणि चर्चेची दारं कधीच बंद केलेली नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 12 सामन्यांची कारकीर्द! आता Asian Games स्पर्धेत क्रिकेट खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी
  • भारत सहज जिंकतो कारण त्यांना पिच… पाकिस्तानी माजी क्रिकेटरनं केले गंभीर आरोप
  • Vinayaka Chaturthi 2026: गणरायाची मूर्ती खरेदी करताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवा…
  • 15 प्रश्नांनी उघड केला 21 दिवसांचा प्लान; सासऱ्याच्या हत्येच्या कटात शालू अडकली
  • Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in