• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण

August 12, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील राजकारणात सध्या विविध घडामोडींना वेग आला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे सकाळी 8 वाजता वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यांच्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजप आणि केंद्रातील बड्या नेत्यांवर टीका करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे अधिक लक्ष दिले जात आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या जिमखान्याशी संबंधित मुद्द्यावरही या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.

राज ठाकरे यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकही उपस्थित होते. यापूर्वी राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबतची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीचा राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरही अर्थ लावला जात आहे. त्यामुळे पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सर्वत्र याची चर्चा सुरू आहे. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांच्या माहितीनुसार, भेटीत रस्त्यांची दुरावस्था, नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाबाबत चर्चा झाली. 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in