• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP Saurav Das : वयाच्या 18 व्या वर्षीच… दीपकेंच्या खांद्याला खांदा लावून लढणारा सौरभ दास कोण? माहिती वाचून…

July 25, 2026 by admin Leave a Comment


Saurav Das Educational Qualification : NEET पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे मुख्य प्रवक्ते सौरभ दास हे चांगलाच चर्चेत आहेत. पक्षाच्या शिष्टमंडळासह त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर सौरभ दास कोण, ते काय करतात, किती शिकलेत, ते या आंदोलनातील प्रमुख चेहरा कसे बनले, याबाबत कुतूहल वाढलं आहे. त्यांच्याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. ( All Photos : Social Media)

सौरभ दास हे दिल्लीचे रहिवासी असून त्यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात येण्यापूर्वीच त्यांनी माहितीचा अधिकार (RTI) कायद्याचा प्रभावी वापर करून अनेक महत्त्वाची सरकारी माहिती सार्वजनिक केली होती. अवघ्या 18व्या वर्षापासून त्यांनी RTI कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जातं.

सौरभ दास हे दिल्लीचे रहिवासी असून त्यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात येण्यापूर्वीच त्यांनी माहितीचा अधिकार (RTI) कायद्याचा प्रभावी वापर करून अनेक महत्त्वाची सरकारी माहिती सार्वजनिक केली होती. अवघ्या 18व्या वर्षापासून त्यांनी RTI कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जातं.

सौरभ दास यांची ओळख केवळ पत्रकार म्हणून नाही तर ते सक्रिय RTI कार्यकर्ताही आहेत.  कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी महामारीशी संबंधित प्रलंबित RTI अर्जांचा लवकर निपटारा व्हावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) अनेक प्रलंबित प्रकरणांवर वेगाने सुनावणी सुरू केली. याशिवाय त्यांनी आरोग्य सेतू अॅप सोशल मीडियावरील सरकारी कारवाई JNU हिंसाचार प्रकरण आणि इतर अनेक सार्वजनिक विषयांवर RTIच्या माध्यमातून माहिती मिळवत प्रश्न उपस्थित केले.

सौरभ दास यांची ओळख केवळ पत्रकार म्हणून नाही, तर ते सक्रिय RTI कार्यकर्ताही आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी महामारीशी संबंधित प्रलंबित RTI अर्जांचा लवकर निपटारा व्हावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) अनेक प्रलंबित प्रकरणांवर वेगाने सुनावणी सुरू केली. याशिवाय त्यांनी आरोग्य सेतू अॅप, सोशल मीडियावरील सरकारी कारवाई, JNU हिंसाचार प्रकरण आणि इतर अनेक सार्वजनिक विषयांवर RTIच्या माध्यमातून माहिती मिळवत प्रश्न उपस्थित केले.

सौरभ दास यांच्या अनेक शोधपत्रकारी अहवालांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. सध्या ते 'Complicit Silence: The Court's Role in India's Quiet Suffering' या पुस्तकावर काम करत असून त्यामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेतील विविध मुद्द्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.

सौरभ दास यांच्या अनेक शोधपत्रकारी अहवालांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. सध्या ते 'Complicit Silence: The Court's Role in India's Quiet Suffering' या पुस्तकावर काम करत असून, त्यामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेतील विविध मुद्द्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.

तिहार कारागृहात बंद असलेल्या काही आरोपींसोबतचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सौरभ दास यांचे नाव चर्चेत आले होते. या छायाचित्रांमध्ये दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिद यांचाही समावेश होता. यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा रंगल्या. मात्र सौरव दास यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून ते स्वतःला स्वतंत्र पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता मानतात.

तिहार कारागृहात बंद असलेल्या काही आरोपींसोबतचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सौरभ दास यांचे नाव चर्चेत आले होते. या छायाचित्रांमध्ये दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिद यांचाही समावेश होता. यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा रंगल्या. मात्र, सौरव दास यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून ते स्वतःला स्वतंत्र पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता मानतात.

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ची स्थापना अभिजीत दिपके यांनी केली. NEET पेपर लीक आणि परीक्षा सुधारणेच्या मुद्द्यावर पक्षाने आंदोलन सुरू केल्यानंतर सौरभ दास यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते सातत्याने माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडत असून आंदोलनाच्या नियोजनातही सक्रिय भूमिका बजावत आहेत.

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ची स्थापना अभिजीत दिपके यांनी केली. NEET पेपर लीक आणि परीक्षा सुधारणेच्या मुद्द्यावर पक्षाने आंदोलन सुरू केल्यानंतर सौरभ दास यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते सातत्याने माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडत असून आंदोलनाच्या नियोजनातही सक्रिय भूमिका बजावत आहेत.

सौरभ दास आणि CJPच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता उत्तरदायित्व आणि पेपर लीक रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

सौरभ दास आणि CJPच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि पेपर लीक रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या समस्या केवळ नवीन कायदे करून सुटणार नाहीत. परीक्षा प्रणालीमध्ये व्यापक पारदर्शक आणि दीर्घकालीन सुधारणा करणे ही काळाची गरज असल्याचे CJPचे मत आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्या केवळ नवीन कायदे करून सुटणार नाहीत. परीक्षा प्रणालीमध्ये व्यापक, पारदर्शक आणि दीर्घकालीन सुधारणा करणे ही काळाची गरज असल्याचे CJPचे मत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in