
जंतर मंतरवर महिनाभर सुरू असलेल्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधातील तरुणांच्या संयमाचा सोमवारी बांध सुटला. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात हजारो तरुण- तरुणी संसदेवर धडकले. पावसाळी अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तमाम मंत्री, खासदार संसदेत उपस्थित असताना आंदोलकांचे लोंढेच्या लोंढे संसदेच्या मुख्य द्वारावर येऊन दाखल झाले. तर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका सीजेपीने जे. पी. नड्डा यांच्यासमोर मांडली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आजचा 32 वा दिवस आहे. आजही सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा-मनोरंजन क्षेत्र आणि इतरही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Leave a Reply