• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP protest : मारहाण करणाऱ्या पोलिसांचं टेन्शन वाढलं, सीजेपीची मोठी घोषणा…, नवा प्लॅन आला समोर

July 27, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनाता पार्टीच्या वीतने दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. वीस जुलै रोजी आंदोलकांनी थेट संसदेवर मोर्चा काढला, या दरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले, पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला. या हल्ल्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले होते. दरम्यान ज्यांनी हल्ला केला त्या पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीची आहे, त्यासाठी आता सीजेपीच्या वतीने एक नवा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याबाबत सीजेपीचे प्रवक्ते सैरभ दास यांनी माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले सैरभ दास? 

२० तारखेला जेव्हा पोलिसांनी मारहाण केली. त्यावेळी आम्ही पण केला होता. पोलीस आणि आरएफवाले मुलींना, मुलांना मारण्यासाठी आले होते. त्यांचा विनयभंग करण्यासाठी आले होते. आम्ही या सर्व पोलिसांच्या विरोधात तक्रार देणार आहोत. कोर्टात जाणार आहोत. आम्ही आमच्या वेबसाईटवर https://www.cockroachjantaparty.org/saakshi साक्षी नावाचा प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. ज्यांच्याकडे पिक्चर आणि व्हिडिओ आहेत त्यांनी त्या दिवसाचे पिक्चर आणि व्हिडिओ अपलोड करावे. पुरावे म्हणून हे उपयोगी येईल. त्यावर तुम्ही तुमची स्टोरी लिहा. आमची टीम याची छाननी करेन आणि त्यानुसार पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांची जबाबदारी फिक्स व्हावी यासाठी आम्ही हा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती यावेळी सौरभ दास यांनी दिली आहे. दरम्यान यामुळे आता आंदोलनादरम्यान लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान मंत्री जेपी नड्डा यांनी भविष्यात कोणतीही तक्रार करणार नाही. आणि कुणावरही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत असं सांगितलं होतं. काल मंगळवारपर्यंत अ‍ॅग्रीमेंट देणार होते. लिखित अ‍ॅग्रीमेंट देणार होते. आम्ही सरकारची वाट पाहत आहोत. नड्डा यांनी पीसीत सांगितलं होतं. आणि ट्विटही केलं होतं. त्यांनी अ‍ॅग्रीमेंट केलं आहे. सीनियर मंत्र्याने करार केला आहे. त्यामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जाणार नाही. गुन्हे मागे घेतील ही आशा आहे. कालपर्यंत लिखित अ‍ॅग्रीमेंट दिलं नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू, असा इशारा  यावेळी सीजेपीचे नेते रांका यांनी दिला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in