• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP Protest : पंतप्रधान मोदींविरोधात अभिनेत्रीने कायं केलं? थेट होतेय अटकेची मागणी, अनेक पोलीस स्थानकांत तक्रार दाखल

July 27, 2026 by admin Leave a Comment


CJP Protest : NEET पेपरफुटीनंतर सीजेपीकडून आंदोलन पुकारण्यात आलं आणि या आंदोलनात मोठ्या संख्यने विद्यार्थी उपस्थित राहिले. एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरले. पण शुक्रवारी कोलकाता येथे आंदोलनात सामिल झालेली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या विरोधात अनेक पोलीस स्थानकात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत. श्रीलेखा हिच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह पोस्टर प्रदर्शित केल्याचे आरोप आहे. दरम्यान, परिस्थिती पाहता, भाजप पक्षाच्या प्रवक्त्या केया घोष यांनी आनंदपूर पोलीस स्थानकात अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल केली. एवढंच नाही तर, विधाननगर सायबर क्राईममध्ये सोबतच अन्य पोलीस स्थानकात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व दाखल करण्यात आलेल्या तक्रारी स्वीकारण्यात आल्या आहेत. तपास केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. सांगायचं झालं तर, 24 जुलै रोजी कोलकाता येथे ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात श्रीलेखा मित्रा हिने देखील सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान अभिनेत्रीच्या हातात एक पोस्टर होतं, ज्यावर कथितरीत्या पंतप्रधानांचे एक आक्षेपार्ह फोटो होते.

अनेक पोलीस स्थानकांपर्यंत पोहोचलं प्रकरण…

विद्यर्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला. पण श्रीलेखा मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकली. आता हे प्रकरण केवळ आनंदपूर पोलीस ठाण्यापुरतेच मर्यादित राहिलेलं नाही. भाजप कार्यकर्त्यांनी बारुईपूर आणि शांतीपूर येथेही तक्रारी दाखल केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, बिधाननगर सायबर क्राईम पोलीस ठाण्यातही यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्यानंतर, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

अभिनेत्री श्रीलेखा मित्रा हिची प्रतिक्रिया…

तक्रार झाल्यानंतर, श्रीलेखा हिने गंभीर आरोप केले आहेत. श्रीलेखा म्हणतेय, ‘तिला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. मोबाईलच्या माध्यमातून देखील धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर शिवीगाळ करण्यात येत आहे… मेसेन्जरवर अश्लील संदेश पाढवण्यात येत आहेत. आता हे प्रकरण फक्त कायदेशीर राहिलेलं नाही. या प्रकरणामध्ये माझ्यावर वैयक्तिकरित्या निशाणा साधण्यात येत आहे… आता अनेक ठिकाणी माझ्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आणि हा एक मोठा कट आहे..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. आता याप्रकरणात पुढे काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख…
  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in