• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

July 23, 2026 by admin Leave a Comment


CJP Protest at Jantar Mantar: दिल्लीतील जंतरमंतर हे देशाच्या तरुणाईचे नवीन डेस्टिनेशन ठरले आहे. सरकारविरोधातील नारे ट्रेडिंगमध्ये आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष ही मैदानात उतरले आहेत. NEET पेपरलीक प्रकरणी चौकशी आणि दोषींना शिक्षा देण्याची तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी रेटली आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात भर पावसात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचे लोण आता देशभरात पोहचले आहे. पण मोदी सरकार प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या तयारीत नाही. त्याऐवजी सरकारने मोठा प्रस्ताव ठेवला आहे.

सरकारच्या मनात काय?

केंद्र सरकार कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार आहे. पण जंतरमंतरवरच चर्चा करा ही अट सरकारला मान्य नाही. त्याऐवजी दुसरे ठिकाण निश्चित करण्याचा सरकारचा आग्रह आहे, असे एका अधिकाऱ्याने PTI या वृत्तसंस्थेला सांगितल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थित सरकारचेही बैठकांचे सत्र सुरू आहे. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदे जे. पी. नड्डा यांनी संसदेत कथित नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी चर्चेस तयारी दर्शवली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यास सरकार तयार नाही. तर त्याऐवजी पीडित कुटुंबियांना भरपाई देण्याची सरकारने तयारी दर्शवली आहे.

सरकारचा प्रस्ताव काय?

सरकार संसदेत चर्चेस तयार आहे. अल्पकालीन असो वा दीर्घकालीन चर्चेसाठी विरोधकांनी समोर येण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर विरोधकांनी सतत भूमिका न बदलण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

संसद हेच चर्चेसाठी योग्य मंच आहे. याचठिकाणी चर्चा करण्याची तयारी सरकारची आहे. जे. पी. नड्डा यांनी विरोधकांना चर्चेला येऊन उपाय शोधण्याचे आवाहन केले आहे.

आंदोलनातील मुलं आपलीच आहे. ती देशाचे भविष्य आहे. त्यांच्या भविष्याचे संरक्षण करणे विरोधक आणि सरकारचे कर्तव्य आहे. या विषयाच्या प्रत्येक पैलूवर चर्चेअंती ठोस धोरण तयार करण्यास सरकार तयार असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

तर काल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. सरकार त्यांचा राजीनामा का घेत नाही, असा रोकडा सवाल त्यांनी केला. आंदोलकांच्या मागण्या कोणतीही तडजोड न करता पूर्ण करण्याची आग्रही मागणी त्यांनी रेटली. सध्या प्रधान यांच्या राजीनाम्यावरून कोंडी वाढल्याचे दिसत आहे. कोंडी न फुटल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in