• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP protest : जंतर मंतरवरील हजारो आंदोलकांच्या जेवणासाठी पैसे कुठून आणले? जुनैदचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, प्रकरणात ट्विस्ट

July 27, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनात पार्टीकडून करण्यात येत होती. त्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीमधील जंतर मंतरवर महिनाभर आंदोलन केलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चा काढाण्यात आला, या मोर्चात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली, या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला, हजारो विद्यार्थी आंदोलनासाठी जंतर -मंतरवर दाखल झाले. दरम्यान आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था केल्याने जुनैद चांगलाच चर्चेत आला होता. जुनैद याने एवढे पैसे कुठून आणले? त्याने एवढ्या मोठ्या संख्येनं जंतर -मंतरवर दाखल झालेल्या आंदोलकांच्या जेवणाची सोय कशी केली? असे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत होते. अखरे आता जुनैद समोर आला असून, त्याने सर्व प्रश्नाची उत्तरं दिली आहेत.

जुनैदने जंतर मंतरवर आलेल्या हजारो आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. तब्बल चार ते पाच दिवस तो जंतर मंतरवर तळ ठोकून होता. मात्र ज्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, त्यानंतर जंतर मंतरवर झालेल्या जल्लोषात तो कुठेच दिसला नव्हता, जुनैद कुठे गायब झाला असा प्रश्न अनेकांना पडला होता. याबाबत माहिती देताना त्याने मोठा खुलासा केला आहे. 24 जुलैच्या रात्री मला एका कुत्र्याने चावा घेतला होता, त्यामुळे मी उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. जेव्हा मी रुग्णालयातून वापस येत होतो, तेव्हा माला ताब्यात घेण्यात आलं, पोलिसांनी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. मला 17 ते 18 तास ताब्यात ठेवलं त्यानंतर मला उत्तराखंडमधील मसुरीला नेऊन सोडलं.

दरम्यान एवढ्या मोठ्या संख्येनं तिथे उपस्थित असलेल्या आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था कशी केली? याबाबत देखील जुनैदने मोठा खुलासा केला आहे. जुनैद हा पेशाने एक वकील आहे, तो म्हणाला मी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. सहा जुलै रोजी मी या आंदोलनात सहभागी झाला होतो. वीस जुलै रोजी एक परीक्षा देऊन वापस येत असताना मी पुन्हा जंतर -मंतरवर गेलो तेव्हा पाहिलं की आंदोलकांना पाणी सुद्ध मिळत नाहीये, मग मी त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर जेवणाची व्यवस्था देखील केली या कामासाठी माझ्यासोबत लोक जोडत गेले, मी कोणाकडूनही फंड किंवा पैसे घेतले नाहीत, असा खुलासा जुनैद यांनी केला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in