• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP चा मोर्चा संसदेवर जाणार का? लाठीचार्जनंतर घटनास्थळी परिस्थिती काय? महत्वाची माहिती समोर

July 20, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. जंतर-मंतरवरवरून संसदेवर मोर्चा हा धडकणार आहे. या ‘संसद मार्च’मध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले आहेत. या मार्चमध्ये विरोधी पक्षाचे नेते देखील सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे. काल अभिजीत दीपकेंवर शाईफेक झाल्यानंतर वातावरण तापल्याचं सांगण्यात येत आहे. तर या आंदोलनावेळी संसदेकडे जाणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. आता घटनास्थळी काय परिस्थिती आहे, माहिती समोर आली आहे.

एका आंदोलकाने सांगितलं की, अभिजीत दीपकेंवर शाईफेक झाली, त्यावेळी जवळपास 200-300 जण होते. दीपकेंवर शाईफेक झाल्यानंतर परिस्थिती बदलली. जिथे 300 जण होते, तिथे 3000 जण जमा झाले. लोकांना उभे राहण्यासाठी देखील जागा नव्हती. आंदोलक एका जागी बसून दिवस-रात्र काढत आहेत. आंदोलकांची केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. सरकारचे प्रतिनिधी संवाद साधण्यास यायला तयार नाही. देशाच्या विविध भागातून तरुण येत आहेत. आंदोलक तीव्र झाले आहेत. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक आहेत. पोलिसांकडून आंदोलकांचा संसदेकडे जाण्याचा मार्ग रोखल्याची माहिती मिळतेय.’.

राज्यातही ठिकठिकाणी आंदोलन

नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरवरून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दिल्लीनंतर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला राज्यातूनही पाठिंबा मिळत आहे. पुण्याच्या FTIIमधील विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. या विद्यार्थ्यांकडूनही केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यांनी कॉलेज परिसरात मोर्चा काढला. त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेविरोधातील कथित गैरव्यवहारांवरही रोष व्यक्त केला. ठाण्यातूनही विद्यार्थ्यांनी आंदोलन करत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. हातात झेंडे, पोस्टर घेऊन विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. ठाकरे गट, काँग्रेस, मनसे, शरद पवार गटाने मिळून दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी कुडाळच्या तहसील कार्यालायााबाहेर एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sonali Kulkarni: सलमानपेक्षा 9 वर्षांनी लहान असूनही का साकारली आईची भूमिका; सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली..
  • जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले…
  • मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढवणारी बातमी, रिपोर्ट दिसताच…खुद्द जरांगेंनीच व्यक्त केली शंका; काय घडलं?
  • धाड.. धाड कोसळणार सोन्याचे दर, सरकार थेट निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट अर्ध्यावरच..
  • जगातील ‘ओम’ आकाराचं सर्वात पहिलं मंदिर… आध्यात्म, भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in