
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान आता वैद्यकीय पथकाकडून त्यांची नियमितपणे तपासणी करण्यात येत आहे. मात्र डॉक्टरांनी जो रिपोर्ट दिला आहे, त्यावर खुद्द मनोज जरांगे पाटील यांनीच शंका उपस्थित केली आहे. पत्रकारांनीच या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावावा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. रविवारी संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. मात्र त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता त्यांच्या शरारातील साखरेची पातळी झपाट्याने कमी, कधी जास्त होत असल्याचं समोर आलं आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Leave a Reply