
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे लाखो चाहते आहेत. पण चाहत्यांना फक्त अमिताभ यांचा अभिनयच आवडत नाही, तर त्यांच्या सवयी, त्यांच्या खासगी आयुष्यातील किस्से, कुटुंबातील गमती-जमती याबद्दलही जाणून घेण्यास चाहते खूप उत्सुक असतात. अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) दोघेही फिल्म इंडस्ट्रीतील. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिषेकही याच क्षेत्रात आला, ते अनेकदा चित्रपटातही एकत्र दिसले. पण त्या दोघांचं नातं फक्त पिता-पुत्र यापुरत मर्यादित नाही तर ते एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत.अनेकदा अमिताभ बच्चन हे अभिषेकबद्दल काही ना काही सांगत असतात. ‘कौन बनेगा करोडपती’ हा त्यांचा शो पुन्हा सुरू झाला असून, नुकतंच त्यांनी या शोमध्ये अभिषेकबद्दल फारश माहित नसलेली गोष्ट सर्वांसमोर उघड केली. त्याचा हा किस्सा ऐकून प्रेक्षक अवाक् झाले तर काहींना त्यांचं हसूच आवरेना.
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आलेल्या एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधतानाच त्यांचं आणि अभिषेकचं नातं हाँ विषय काढला. लाडक्या मुलाबद्दल बिग बी मोकळेपणाने बोलले, पण याचेवळी त्यांनी अभिषेकची पलखोल करत त्याच्या एका विचित्र सवयीबद्दलही सर्वांना सांगितलं. अमिताभ यांनी अतिशय मजेशीर अंदाजात अभिषेकची विचित्र सवय सांगितली, ते ऐकून उपस्थितांनाही हसू आवरेनासं झालं.
अभिषेकला विचित्र सवय.. काय म्हणाले बिग बी ?
केबीसी शो दरम्यान एका स्पर्धकाने अमिताभ यांना म्हटलं की तुमचं , तुमच्या मुलाशी अगदी मैत्रीचं नातं आहे ना.. ते ऐकून अमिताभ म्हणाले, ‘ मी अभिषेकला माझा चांगला मित्र मानतो, पण त्याची एक विचित्र सवय आहे, ती म्हणजे को कधीच फळं खात नाही. ‘
पुढे ते म्हणाले, ‘ कुटुंबातील र्व सदस्य फळं खातात, पण अभिषेकच्या बाबतीत तसं नाही. तसंच जर एखादा दुधाचा पदार्थ असेल, तर तो खाण्यासही अभिषेक फार उत्सुक नसतो, पण फळं.. ? फळ खायला तर तो कधीच तयार नसतो
‘ असं म्हणत मजेशीर अंदाजात बिग बी यांनी आपल्या लाडक्या लेकाची तक्रार केली.
वडिलांच्या कवितेमुळे झाले भावूक
शोमध्ये बऱ्याच मजेशीर गप्पा झाल्या, त्यानंतर वातावरण थोडं इमोशनल झालं. त्याचं कारण म्हणजे, अमिताभ बच्चन यांना त्यांचे वडील, ज्येष्ठ कवी हरिवंश राय बच्चन यांची एक कविता आठवली. या कवितेमध्ये पिता-पुत्राचं नातं, वारसा आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या विचारांची चर्चा करण्यात आली आहे. अमिताभ यांनी या कवितेचा उल्लेख केला.
आयएफएसमध्ये जायचं होतं स्वप्न
यापूर्वी शोच्या एका भागात अमिताभ यांनी त्यांच्या जुन्या स्वप्नाचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं, ‘एक काळ असा होता, जेव्हा माझ्या मनात आयएफएसमध्ये जाण्याचा विचार आला होता. मीही सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देऊन भारतीय परराष्ट्र सेवेत करिअर करण्याचा विचार केला होता. मात्र, त्यावेळी मला आयएफएसबद्दल फारशी माहिती नव्हती. मला त्यातील ‘आय’सुद्धा माहीत नव्हते. त्यामुळे मी हा विचार सोडून दिला ‘ असं बिग बी म्हणाले.
Leave a Reply