• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज, प्रसिद्ध कॉमेडिनयची बायको जखमी, तीव्र वेदनेनंतर मोडल्या बरगड्या

July 27, 2026 by admin Leave a Comment


CJP Protest : जवळपास महिन्याभरापासून दिल्ली येथील जंतरमंतर येथे विद्यार्थी आंदोलनासाठी बसलेले. त्यानंतर 20 जुलै रोजी जंतरमंतर ते संसदेपर्यंत मोर्चा पुकारण्यात आला. NEET पेपरफुटीचं प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी CJP आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, पाण्याचे फवारे देखील मारण्यात आले. एवढंच नाही तर, आंदोलकांना पांगवण्यासाठी गॅस टीअरचा देखील वापर करण्यात आला. 20 जुलै रोजी दिल्ली विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, तर 22 जुलै रोजी मुंबईत झालेल्या आंदोलनात अनेक प्रसिद्ध चेहरे देखील उतरलेले. ज्यामध्ये प्रसिद्ध कॉमेडियन रौनक रजानी आणि त्याची बायको देखील होती.

रौनक रजनी आणि त्याची बायको मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित एका आंदोलनात सहभागी झाले होते. मुंबई पोलिसांनी त्यांना बळजबरीने ताब्यात घेतल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ या विनोदी कलाकाराने शेअर केला; त्यांनी आरोप केला की, त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं आणि इतकी हिंसाचार करण्यात आला की त्यांच्या पत्नीच्या बरगड्यांना दुखापत होऊन त्या मोडल्या, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Raunaq Rajani (@sirraunaqrajani)

 

रौनक याने हा दावा सबळ पुरावे सादर करत केला आहे. त्याने संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ देखील शेअर केला आणि सांगितलं, कशा प्रकारे त्याच्या बायकोच्या बरगड्या मोडल्या. संपूर्ण समजावत रौनक म्हणाला, ‘मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांना बेकायदेशीरपणे लोकांना ताब्यात घेतलं. त्याच वेळी मला आणि माझ्या बायकोला पोलिसांनी पकडलं… कदाचित पोलीस व्हॅनमध्ये बसत असताना तुम्ही अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील पाहिले असतील…’

कॉमेडीयन म्हणाला, ‘पोलिसांना बळजबरी धक्का देत आम्हाला व्हॅनमध्ये बसवलं. या दरम्यान माझ्या मानेला दुखापत झाली. दुसरीकडे, माझ्या पत्नीची बरगडी मोडली. याचा आम्ही फार मोठा विषय केला नाही. खरं सांगायचं तर, गेल्या आठवड्यात लोकांनी पोलिसांच्या क्रूरतेच्या यापेक्षाही वाईट घटना अनुभवल्या आहेत. त्यामुळे, आम्ही तो विषय तिथेच सोडून देण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 23 जुलैला, आम्ही दिल्लीला गेलो. परत आल्यावरही तिची वेदना कमी होत नव्हत्या. डॉक्टरांकडे गेल्यावर X-ray केल्यावर हाड मोडल्याचं समोर आलं…’ असं देखील कॉमेडियन पोस्टमध्ये म्हणाला आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in