• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CET Exam Scam | बारावीत 35%… MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!

July 28, 2026 by admin Leave a Comment


नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर गाजलेल्या परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील एमएच-सीईटी (MHT-CET) 2026 परीक्षेबाबतही गंभीर आरोप समोर आले आहेत. या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत असून, या आरोपांमुळे राज्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणावर सर्वप्रथम अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव सचिन सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले. बारावीच्या परीक्षेत केवळ 35 ते 40 टक्के गुण मिळवलेल्या काही विद्यार्थ्यांना एमएच-सीईटी परीक्षेत 90 ते 100 पर्सेंटाईल कसे मिळाले, असा सवाल त्यांनी उपस्थित करत संपूर्ण निकालाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधत परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेव बालगुडे यांनीही या प्रकरणात उडी घेत आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर एका शिक्षकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एमएच-सीईटी 2026 परीक्षेच्या निकालात कथित अनियमितता झाल्याचा दावा करण्यात आला असून, परीक्षा प्रक्रियेत घोटाळा कसा झाला असावा याबाबत संबंधित शिक्षकाने आपली भूमिका मांडली आहे. यासोबतच त्या शिक्षकाच्या यूट्यूब चॅनेलची लिंकही शेअर करण्यात आली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं होतं. त्या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टी (CJP)ने पाठिंबा देत जंतर-मंतर येथे दीर्घकाळ आंदोलन केलं. या आंदोलनानंतर तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता एमएच-सीईटी परीक्षेबाबत करण्यात आलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मात्र, एमएच-सीईटी 2026 परीक्षेत घोटाळा झाल्याच्या आरोपांबाबत संबंधित शासकीय यंत्रणा किंवा परीक्षा प्राधिकरणाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पोस्ट ऑफिसमधील PPF, SSY आणि SCSS खाती बँकेत ट्रान्सफर करता येतात का? जाणून घ्या पोस्टाचा अधिकृत नियम
  • ऋषभ पंत विकेटकिपिंग का करत नाही? अखेर तो धक्कादायक फोटो समोर आलाच; काय घडलं?
  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in