
NEET पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) केलेलं आंदोलन देशभरात गाजलं. त्यावरून सुरू झालेला गदारोळ शिक्षणमत्र्यांच्या राजीनाम्यानंतर जरा थंडावला. ते प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता राज्यात NEET पेक्षाही MHT-CET मध्येही महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला असून त्यामुळे पुन्हा खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया एक्स हँडलवरून शेअर केला आहे. त्यात एका शिक्षकाने एमएच-सीईटी 2026 मध्ये कसा महाघोटाळा झाला याविषयी भाष्य केल्याने परत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता याप्रकरणावर CET सेलने मौन सोडलं असून पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं म्हणत CET सेलचे आयुक्त सरदेसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काही विद्यार्थी बोर्डापेक्षा सीईटीला जास्त प्राधान्य देतात, त्यामुळे त्यांना सीईटी परीक्षेत जास्त गुण असतात. दोन परीक्षांमध्ये तुलना करण चुकीचं आहे. टक्के आणि पर्सेंटाईल यांची तुलना चुकीची असल्याचं सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितलं.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply