पुण्याच्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो तयार असूनही या मेट्रोच्या उद्घाटनास विलंब होत असल्याने पुणेकरांना मेट्रोची प्रतिक्षा लागली आहे.या मेट्रोमुळे पुणेकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे आणि तसेच पुणेकरांची प्रदुषणातून सुटका होणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो तीन हा १३.३ किमीचा टप्पा बांधून तयार आहे. हा १२ स्थानकांच्या मार्गाचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, या […]
Latest News
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मराठा महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. ओबीसी मंत्र्यांची मुले आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात जातात, असे वाघमारे यांनी म्हटले होते. या वक्तव्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चंद्रकांत भोसले यांनी नवनाथ वाघमारेला दिसेल तिथे ठोकणार असा इशारा […]
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर शहरात वृक्ष प्राधिकरणाच्या नियुक्तीवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात या मुद्द्यावरून तीव्र कुरबूर सुरू झाली आहे. भाजपने आदर्श तायडे यांची वृक्ष प्राधिकरण समितीवर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता चेंदवणकर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. चेंदवणकर यांच्या म्हणण्यानुसार, आदर्श तायडे यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली […]
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध आणि दूषित पाण्याची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीलबंद बॉटलमध्ये दूषित पाणी आढळल्याचा दावा ग्राहकांकडून करण्यात आला असून, संबंधित बॉटलवर एक्सपायरी डेट नसल्याचाही आरोप आहे. शुद्ध आणि सुरक्षित पाण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची […]
डॉन दाऊदच्या खास माणसाचा गेम, दिल्ली एअरपोर्टवर पोलिसांनी…ऑपरेशन थेट सक्सेसफुल
अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात दाऊद इब्राहिम याचा खास मानला जाणार हस्तक आणि इंटरपोलचा वाँटेड गुंड अख्तर मर्चंट याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मर्चंट हा गेल्या 3 वर्षांपासून फरार होता. 2023 साली काशीमीरा येथील बेकरीवर गोळीबार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे, याच प्रकरणात तो वाँटेड होता. इंटरपोलच्या वाँटेड लिस्टमध्येही त्याच्या नावाचा समावेश होता. इंटरपोलच्या सूचननेनुसार, पोलिसांनी […]
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यातील यशदा सेंटरमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकाच व्यासपीठावर दिसले. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वे एकाच मंचावर उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा कार्यक्रम शिवाजीराव देशमुख लिखित आठवणींची ओंजळ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी शरद पवार आणि नितीन […]