मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एका निर्णयाने वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मुंबईच्या महापौर तावडे या सोशल मीडियावर लाइक्स मिळवण्यासाठी तब्बल 25 लाख खर्च करणार आहेत. मुंबई महापालिका आता महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च करणार आहे. महापौरांचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज प्रस्ताव मांडला जाणार आहे. महापालिकेच्या या […]
Latest News
Maharashtra News LIVE : लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने कुटुंबाला 10 लाखांच्या खंडणीचे ई-मेल
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच पक्षावरील अधिकाराचा प्रश्न त्यांच्या युक्तिवादाच्या केंद्रस्थानी आहे. मागील सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही आक्षेप घेत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आयोगाने आपल्या अधिकारक्षेत्राच्या मर्यादा ओलांडल्याचा दावा त्यांनी केला होता. सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण […]
Maratha-OBC Andolan : आझाद-मैदानावरुन मराठा-ओबीसी आमने-सामने, दोघांचे अर्ज, कोणाला मिळणार परवानगी?
राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापलं आहे. एकीकडे अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे मराठा-ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा-ओबीसी समाजाने एकाच वेळी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगे यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. तर मनोज जरांगे यांच्या आधीच ओबीसी आंदोलनकांनी आझाद मैदानासाठी पोलीस ठाण्यात परवानगी मागितली […]
धक्कादायक, वॉचमनकडून शाळेतील विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण
नागपूर जिल्ह्यातील कोंडाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील एका निवासी आश्रम शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोपावरून आश्रम शाळेच्या नाईट वॉचमनला कोंढाली पोलिसांनी अटक केली आहे. शिपाई राजेश मूलचंद मालापुरे याच्याविरुद्ध बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड […]
“जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादा जाताच समस्यांनी डोकं वर काढलं? पवार कुटुंबाला लिहिलेल्या खुल्या पत्राने खळबळ
जरा बारामतीकडेही लक्ष द्या, अशी अर्जव बारामतीकरांनी केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. पण दादा गेल्याने बारामती पोरकी झाल्याची जाणीव नागरिकांना होत आहे. अजितदादानंतर वाढत्या गुन्हेगारीमुळे बारामतीकर हवालदिल झाले आहेत. आता या शहराकडे पवार कुटुंबियांनी लक्ष द्यावे यासाठी त्यांनी खुले पत्र लिहिले आहेत. […]
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय बैठकीमध्ये 10 हजार 502 कोटींची मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत हे काम केलं जाणार आहे. मेट्रो-13 ला मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी मिळाली आहे. मीरा-भाईंदर ते वसई-विरार संपूर्ण प्रकल्प हा ग्रीनफिल्ड असेल. 6 महिन्यांमध्ये भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेत. Source link