संदीप जाधव : संपूर्ण राज्याचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे. सर्व प्रमुख नेत्यांना पायाला भिंगरी लावून प्रचार केला आहे. अनेक पक्ष घराणेशाहीला विरोध करतात मात्र या निवडणुकीत अनेक आमदारांना आपल्या घरातील सदस्यांना निवडणुकीच्या मैदावात उतरवल्याचे दिसत आहे. कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाची भावजय असे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आमदारांनी आपली […]
Latest News
Chanakya Neeti : काय चुकीचं काय बरोबर काही कळत नाहीये? चाणक्य म्हणतात असा टाळा मनाचा गोंधळ
आर्य चाणक्य हे एक महान विद्वान होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात की अनेकदा माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की त्याला त्यावेळी काय चुकीचं? काय बरोबर? हे कळत नाही. निर्णय घेताना मनाचा गोंधळ उडतो. मनाची द्विधा अवस्था असते. अशा स्थितीमध्ये जर आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसंदर्भात निर्णय घेण्यास उशिर झाला तर […]
Maharashtra Elections 2025 : बायको की सून? मतदारांचा कौल कुणाला? पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडलं?
सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे. नगराध्यक्षपद हे यावेळी थेट जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षाने आपल्या ताकदवान उमेदवाराला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीवर आपलचं वर्चस्व राहावं म्हणून प्रत्येक नेत्याची धडपड सुरू आहे. त्यासाठी कुणी रिंगणात बायकोला उभं केलंय, तर कुणी सुनेला उमेदवारी देऊन आपलं आव्हान कायम […]
Rupali Thombre Patil : रूपाली ठोंबरे पाटलांनी NCP शहर कार्याध्यक्ष पद सोडलं, दोन दिवसांपर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी अन्….
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्याध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केल्याचे वृत्त आहे. मात्र, पक्षाकडून त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाहीये. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या राजकीय वाटचालीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. गेल्या काही काळापासून रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज […]
धक्कादायक ! प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परंड्यात ‘अंधश्रद्धे’चा प्रवेश; कोण होतं टार्गेट ?
राज्यात सध्या नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्राचर अंतिम टप्प्यात आला आहे. परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचारही शेवटच्या टप्प्यात असचानाच तिथे जादूटोण्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील खाँजा खलील दर्गाह कब्रस्तानात जनशक्ती नगरविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर करून जादूटोणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोठी खळबळ माजली असून सर्वांनाच मोठा […]
नवविवाहित दाम्पत्याला घेऊन कुटुंब तुळजाभवानीच्या दर्शनाला, देवीच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला, एका क्षणात…
राज्यातील अपघातांच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एका हृदयद्रावक घटनेची भर पडली आहे. बार्शी-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील जांभळबेट घारी शिवार पुलावर आज, १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी भीषण अपघात झाला. यावेळी मालट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील रहिवासी होते. ते तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी निघाले […]