ज्ञानेश्वर लोंढे – छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर शुक्रवारी दुपारी जी घटना घडली ती ऐकून अनेकजण हादरले. आयफोनच्या मुद्यावरून कुटुंबात झालेला वाद, मुलाने डोंगरावरून उडी मारण्याचा घेतलेला निर्णय, त्याला वाचवताना वडिलांचाही झालेला मृत्यू आणि ते पाहून त्याच्या आईनेही उडी मारून दिलेला जीव. अवघ्या काही क्षणात एका कुटुंबाची झालेली वाताहत पाहून अनेकांचे डोळे पाणावले नाहीत तर नवल. […]
Latest News
देशांतर्गत क्रिकेट सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने बाजी मारली, राजस्थान रॉयल्सचा मास्टर गळाला
आयपीएल स्पर्धेला आता सहा महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला असून मार्च 2027 मध्ये स्पर्धा सुरू होईल. असं असताना फ्रेंचायझी आपला संघ बांधण्यासाठी धडपड करत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने एक मोठा डाव टाकला आहे. आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी झुबिन भरूचा यांची मुंबई इंडियन्सने टीमचे नवे डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्ती केली आहे. झुबिन भरूचा हे 2008च्या पहिल्या […]
साखरेचे भाव वाढले, चहाचा कपही महागला, जिलेबी, मिठाईसह सर्वांचेच भाव वाढणार
सकाळची सुरुवात असो किंवा कामाच्या धावपळीतला छोटासा ब्रेक… चहाचा एक कप हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र आता साखरेच्या वाढत्या दरामुळे चहाचा गोडवा कायम ठेवताना चहावाल्यांच्या तोंडाला मात्र घाम फुटू लागलाय. साखरेसोबतच दूध, चहापत्ती आणि गॅसच्या दरातही वाढ झाल्याने चहाचा कप महागलाय. दरवाढी अगोदर 8 रुपयांचा चहाचा कप आता 10 रुपये झालाय. याचा […]
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात…
राहुल गांधी यांची पुणे येथील हॉटेल शेरेटनमध्ये काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू झाली आहे. ही बैठक जवळपास पंधरा ते वीस मिनिटांपासून सुरू असून, राहुल गांधी उपस्थित नेत्यांशी व पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या पुणे दौऱ्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हा आहे. सध्याच्या बैठकीत महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील राजकारणावर सखोल चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमासाठी […]
IND vs SL: कोलंबो कसोटीपूर्वी श्रीलंकन संघाने टाकले फासे, 1996 वर्ल्ड कप विजेत्या सदस्याकडे मोठी जबाबदारी
Hashan Tillakaratne: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोत सुरू होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारताला हा सामना जिंकणं भाग आहे. दुसरीकडे, श्रीलंकेपुढे मालिका वाचवण्याचं आव्हान आहे. असं असताना श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने माजी दिग्गज फलंदाज आणि 1996 वर्ल्डकप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या हर्षण तिलकरत्ने […]
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
काँग्रेस नेते राहुल गांधी छात्रों की गूंज या विशेष कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. पुणे विमानतळावर त्यांचे आगमन झाले असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचे हे छात्रों की गूंज अभियान सुरू झाले आहे. आज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सीओईपी परिसरातील […]