धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. विशेष म्हणजे ओमराजेंना बंडखोरी करण्याच्या बदल्यात मंत्रिपद मिळणार आहे. शिवाय त्यांच्या वडिलांच्या हत्येचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्याचं अमिषही देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियातही या बंडाचे पडसाद उमटले आहेत. या बंडावर सोशल मीडियातून संमिश्र […]
india
Shivsena: ठाकरेंच्या खासदारांना फोडण्यामागचा चेहरा कोण? कुणाच्या नावावर विमाने बुक? मोठी माहिती उघड
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) च्या खासदारांना फोडण्याच्या प्रयत्नात मोठा घडामोडी घडत असल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे. काही खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या सगळ्यामागे खरा चेहरा कोणाचा आहे? […]
Shivsena : तो एक प्रश्न अन् पत्रकार परिषदेत मोठा राडा, उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित ती विचारणा केल्यावर अरविंद सावंत संतापले का?
Aravind Sawant angry in Delhi Press Conference: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या चार खासदारांनी नवी दिल्लीत नुकतीच पत्रकार परिषद घेतली. पक्षातील किती आणि कोणकोणते खासदार शिंदे सेनेच्या गळाला लागले यावर भाष्य टाळण्यात आले. पण पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट संकेत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मिळाले. खासदार संजय राऊत यांनी अशा खासदारांसाठी एक शिवी हासडली. तर त्याचवेळी […]
पुण्यातील चार्टर विमानात कोण कोण, धक्कादायक माहिती पुढे, 6 खासदारांसोबत थेट.. सुषमा अंधारेंच्या दावा..
शिवसेना शिंदे गट पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत आहे. शिवसेनेचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे हे 6 खासदार दिल्लीत आहेत. दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे 6 खासदार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून हे खासदार स्वतंत्र […]
Monsoon Update: दगलबाज मान्सून… आता थेट जुलैमध्येच बरसणार? नव्या अपडेटने टेन्शन वाढलं; उष्णतेच्या लाटेचा अलर्ट
गेल्या महिन्याभरापासून राज्यातील जनता पावसाची अत्यंत अतूरतेने वाट पाहत आहे. पण आज येईल, उद्या येईल असे अंदाज येऊनही पाऊस काही पडताना दिसत नाहीये. आता तर पुन्हा एकदा मान्सूनने दगलबाजी केली आहे. विदर्भासह राज्यातील काही भागात मान्सून आता थेट जुलैमध्येच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या काळात विदर्भासह राज्यात प्रचंड उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत […]
Sanjay Raut । 50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा गौप्यस्फोट
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान खासदार खरेदी-विक्रीबाबत ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचा दावा केला. संजय राऊत यांनी सांगितले की, “काल रात्री एका महत्त्वाच्या व्यक्तीने मला महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू […]