भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपायपर, अँटिक्विटी ब्लू आणि रॉयल चॅलेंज यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या निर्मात्यांसह अनेक मद्य उत्पादकांवर कारवाई सुरू केली आहे. त्यांच्यावर अनधिकृत स्वाद पद्धती वापरल्याचा आणि मद्याच्या वयाबद्दल दिशाभूल करणारे दावे करून अन्न सुरक्षा व लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आता याबाबत कोर्टातही मोठा निर्णय घेण्यात आला […]
india
अख्खे पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या रिसेप्शनला, सुनेत्रा पवार गैरहजर, अखेर काय घडले..
खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचे रिसेप्शन दिल्लीत पार पडले. या रिसेप्शनला मोठे राजकीय नेते उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य बडे नेते उपस्थित होते. या रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. तब्बल 20 मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी या […]
ट्रम्प यांचा एका निर्णयामुळे मोठी खळबळ, पुन्हा तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ, आता पेट्रोल डिझेलचे दर…
Petrol Diesel Rate Today: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ब्रेंट क्रूडच्या किमती सलग तिसऱ्या दिवशी 5 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 90 डॉलरच्या अगदी जवळ पोहोचल्या आहेत. इराणसोबतचा वाढता तणाव या दरवाढीला आणखी खतपाणी घालत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, पूर्वीच्या संघर्षांमध्ये मारल्या गेलेल्यांच्या नुकसानभरपाईसाठी […]
पुण्यात धर्म परिवर्तनाचा प्रयत्न, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकातंर्गत पहिला गुन्हा दाखल
महाराष्ट्र विधानसभेत अलीकडेच महाराष्ट्र धर्म रक्षा अधिनियम कायदा मंजूर झाला. राज्यात आमिष दाखवून किंवा फसवणुकीने होणारे धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे. या कायद्यातंर्गत पुण्याच्या खडक पोलीस स्टेशनमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला आहे. ब्रिटनमधून आलेल्या एका धार्मिक नेत्याचं पुण्याच्या गुरुवार पेठ येथील एका चर्चेमध्ये प्रवचन झालं.या प्रवचनाच्या माध्यमातून धर्म परिवर्तनाचा प्रयत्न सुरु आहे, […]
स्वातंत्र्यदिनी कोण करणार ध्वजारोहण? रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून पुन्हा जुंपणार? बड्या नेत्याची मोठी नाराजी
15 ऑगस्ट रोजी रायगडमध्ये स्वातंत्र्यदिनी कोण करणार ध्वजारोहण? हा कळीचा मुद्दा पुन्हा उभा ठाकला आहे. 2024 पासून रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा वाद तापलेला आहे. मध्यंतरी अनेकदा या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याचे संकेत भरतशेठ गोगावले यांनी दिले होते. पण अद्यापही अधिकृत घोषणा न झाल्याने आता नाराजी नाट्य समोर आले आहे. शिंदे सेना […]
Jharkhand Bandh: विद्यार्थी आंदोलन पेटलं! पोलिसांच्या लाठीचार्जविरोधात बंदची हाक, सुरक्षेसाठी 3000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त
झारखंडमधील परीक्षा घोटाळ्याच्या विरोधातील विद्यार्थी आंदोलन पेटल्याचे समोर येत आहे. विधानभवनावर घेराव मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर झारखंड सरकारविरोधात वातावरण तापलं आहे. भाजपने या लाठीचार्जचा निषेध करत झारखंड बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर जवळपास 3000 पोलीस तैनात केले आहेत. भाजपने बंदची हाक दिल्यानंतर […]