अमेरिका आणि इराण युद्धाचा थेट फटका भारताला बसताना दिसत आहे. युद्ध टोकाला पोहोचले आहे. घातक हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने विचारही केला नव्हता की, इराणकडून अशाप्रकारे हल्ल्यांना प्रतिउत्तर दिले जाईल. होर्मुज सागरी मार्गही इराणने बंद केला. ज्यामुळे जगातील अनेक देशांवर थेट गॅस आणि कच्च्या तेलाचे संकट आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. भारतात […]
india
Devendra Fadnavis | नदीजोड प्रकल्प वेगाने सुरू; उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
राज्यातील नदीजोड प्रकल्प अत्यंत वेगाने पुढे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मराठवाड्यासाठी हा प्रकल्प मोठे वरदान ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उल्हास खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाचा प्री-फिजिबिलिटी रिपोर्ट आता प्राप्त झाला आहे. सुरुवातीला या प्रकल्पातून सुमारे ५४ टीएमसी पाणी उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात […]
जग पुन्हा हादरलं! दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थेट ड्रोन हल्ला, भारतीयासह या देशातील नागरिक…
इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. मोठे हल्ले सातत्याने केले जात आहेत. त्यामध्येच आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन ड्रोन कोसळल्याने खळबळ उडाली. इराण आणि अमेरिका युद्धात इराणच्या निशाण्यावर दुबईचे विमानतळ सुरूवातीपासूनच राहिले आहे. इराणच्या विमानतळावर सतत हल्ले केले जात आहेत. या ड्रोन हल्ल्यात चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. […]
Iran vs Israel US War : युक्रेन काय आम्हाला..अमेरिकेला हाच माज नडला, आज इराण विरुद्ध युद्धात US ला त्याचीच मोठी किंमत चुकवावी लागतेय
सात महिन्यापूर्वी युक्रेनने अमेरिकेला कमी किंमतीच्या इंटरसेप्टर ड्रोनची ऑफर दिली होती. सोबत सेन्सर्स असलेली छोटी एअर डिफेन्स सिस्टिम होती. इराणी बनावटीच्या ड्रोन्सचा सामना करण्यासाठी ही सिस्टिम ऑफर करण्यात आली होती. त्यावेळी अमेरिकन अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या या ऑफरमध्ये फार रस दाखवला नाही. त्यांनी ही सिस्टिम खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. आता पश्चिम आशियात इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध […]
Rahul Gandhi | लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
आज लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. राहुल गांधी यांना अनेक वेळा भाषण पूर्ण न करता रोखले गेले. त्यांनी मागील अधिवेशनाचा संदर्भ देत म्हटले की, मागील भाषणातही त्यांना आपले मुद्दे मांडण्याची संधी दिली गेली नाही आणि फक्त गोंधळ करण्यात आला. मागील लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सलग दोन दिवस विरोधी […]
मोठी बातमी! इराणचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, अमेरिकेचं नाक दाबलं, आता युद्ध थांबणार किंवा थेट महायुद्धच…
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 12 वा दिवस आहे. या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रालयकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणने देखील आपला लढा सुरूच ठेवला आहे. इराणकडून सातत्याने अमेरिकनं सैन्य तळांना लक्ष्य केलं जात आहे. इस्त्रायलवर देखील मोठे मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे […]