हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. खरं तर या सामन्यावर पूर्णपणे भारताची पकड राहिली. पहिल्या क्वॉर्टरपासून चौथ्या क्वॉर्टरपर्यंत भारताची सरशी राहिली. भारताने हा सामना 5-3 ने जिंकला. या सामन्याच्या पाचव्या मिनिटाला भारताने पहिला गोल मारत आघाडी घेतली. त्यामुळे पाकिस्तानवरील दडपण वाढलं. हे दडपण शेवटपर्यंत कायम राहिलं. त्यात सातव्या मिनिटाला […]
cricket
IND vs SL: विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुढे निघून गेला गिल, या कर्णधाराची केली बरोबरी
गॉल कसोटी सामन्यात भारताने शुबमन गिलच्या नेतृत्वात श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. या सामन्यातील दोन्ही डावात शुबमन गिल फेल गेला. पण श्रीलंकेतील पहिला सामन्यातील विजय त्याच्यासाठी खास ठरला. (Photo: PTI) भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात 165 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या सामन्यातील विजयासह गिलने नेतृत्वात भारताने सहावा कसोटी विजय मिळवला आहे. […]
IND vs SL 1st Test : फक्त 2 टेस्टमध्ये मानव सुथारने जे केलं, ते बुमराह-शमीच्या सारख्या दिग्गजांना सुद्धा नाही जमलं
टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. टेस्ट सीरीजच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय टीमने यजमान श्रीलंकेला 165 धावांच्या मोठ्या फरकाने हरवलं. टीम इंडियाने सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथारने टीम इंडियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. मोठं मोठ्या गोलंदाजांना जे आपल्या संपूर्ण करिअरमध्ये जमलं नाही, ते सुथारने पहिल्याच कसोटी सामन्यात […]
IND vs SL: दुसऱ्या दिवसापासून…! श्रीलंकेने सामना कुठे गमावला? कर्णधार धनंजय डिसिल्वाने असं मांडलं गणित
India vs Sri Lanka Test Match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सरशी घेतली. पहिल्या समन्यात श्रीलंकेला 165 धावांनी पराभवाची धूळ चारली. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. खरं तर या सामन्यावरची श्रीलंकेची पकड पहिल्या डावातच सैल झाली होती. कारण भारताला 178 धावांची आघाडी मिळाली होती. त्यात दुसऱ्या डावात भारतीय संघाने कशाबशा […]
WTC 2027: भारताच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ, दुसरा सामना किती महत्त्वाचा?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत एकूण 9 संघ खेळत आहेत. त्यापैकी इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर अव्वल दोन स्थानी जागा मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, बांग्लादेश, भारत आणि श्रीलंका यांच्यात रस्सीखेंच आहे. तीन संघ वगळता इतर संघांच्या कसोटी मालिकेतील निकालावर गुणतालिकेत मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात बांगलादेशने […]
ICC Ranking: आयसीसी क्रमवारीत उलथापालथ, हेडने अव्वल स्थान गमावलं! गिल-जयस्वाल कोणत्या स्थानी?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने कसोटी क्रमवारीत अपडेट केले आहेत. मागच्या आठवड्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्यामुळे त्याचा परिणाम क्रमवारीवर दिसणं सहाजिकच होतं. फलंदाजांच्या क्रमावारीत त्याचा प्रभाव दिसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात ट्रेव्हिस हेड फेल गेला होता. त्यामुळे त्याचं क्रमवारीतील अव्वल स्थान गेलं आहे. इतकंच काय तर त्याची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर […]