• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Car Tyre Air Tips: कारच्या टायर्समध्ये नायट्रोजन भरावे की सामान्य हवा? फायदा कशात जाणून घ्या?

June 25, 2026 by admin Leave a Comment


Nitrogen Air in Car Tyres: कार चालवणारे अनेक लोक अनेकदा संभ्रम दिसतो. टायरमध्ये सामान्य हवा भरावी की नायट्रोजन हवा भरावी याबाबत संभ्रम तयार होतो. पेट्रोल पंप आणि सर्व्हिस सेंटरवर नायट्रोजन गॅस भरण्याचा सल्ला देण्यात येतो. काही जण सामान्य हवेपेक्षा नायट्रोजन हवा भरणे योग्य मानली जाते. तर सामान्य हवेत जवळपास 78% नायट्रोजन पूर्वीपासूनच असते असा पण एक समज आहे. त्यामुळे या दोन्हीमध्ये काय फरक असतो, तुमच्या कारच्या टायरमध्ये कोणती हवा भरणे योग्य राहील?

सामान्य हवा अथवा नायट्रोजनमध्ये अंतर काय?

सामान्य हवा : सामान्य हवेचा विचार करता त्यात अनेक गॅसचे मिश्रण असते. यामध्ये जवळपास 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि उर्वरीत 1% सारख्या कार्बन डायऑक्साईड आणि ऑर्गन यांचा समावेश असतो. यामध्ये ऑक्सिजनसह नैसर्गिक ओलावा (Moisture) सुद्धा टायरमध्ये जाते.

नायट्रोजन गॅस: टायरच्या वापरासाठी कमर्शियल नायट्रोजन गॅस जवळपास 100 टक्के शुद्ध आणि पूर्णपणे कोरडी हवा असते. यामध्ये ऑक्सिजनची मात्र नसल्यातच जमा असते. त्यामुळे या हवेत ओलावा नसतो हे निश्चित आहे.

टायरमध्ये नायट्रोजन भरण्याचे फायदे काय?

Tyre मध्ये दाब स्थिर राहतो

सामान्य हवेत ओलावा कमी होऊन टायरमधील हवा गरम होते. त्यामुळे टायरमधील दाब कमी जास्त होतो. नायट्रोजनमध्ये ही बाब कमी होते. त्यामुळे प्रेशर अधिक स्थिर असते. टायरमधील दाब अधिक कमी जास्त होत नाही.

हवा हळूहळू कमी होते

नायट्रोजनचे मॉलिक्यूल्स मोठे असतात. त्यामुळे रबरातून लवकर बाहेर पडतात. त्यामुळे ही हवा बराच वेळ टायरमध्ये राहते आणि दाब दीर्घकाळपर्यंत टिकतो. नायट्रोजन ड्राय असते. यामध्ये ओलावा नसतो. त्यामुळे व्हिल्स रिम्समध्ये गंज लागण्याचा धोका कमी होतो.

नायट्रोजन हवेमुळे नुकसान काय?

नायट्रोजन हवेचे फायदेच नाहीत, तर नुकसान पण आहेत. या हवेसाठी खर्च जास्त येतो. सामान्य हवा अनेक पेट्रोलपंपावर मोफत मिळते. तर नायट्रोजन हवा भरण्यासाठी 150-200 रुपयांपर्यंत खर्च येतो. नायट्रोजन हवा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नसते. छोटी शहरं, गावात नायट्रोजन हवा मिळत नाही. गरजेच्यावेळी ही हवा मिळत नाही. त्यामुळे जर सामान्य हवा भरली तर नायट्रोजनची शुद्धता कमी होते. त्यामुळे नायट्रोजन टायर्समधील दाब एकसारखा टिकत नाही.

तुमच्यासाठी काय फायदेशीर?

जे लोक दूरचा प्रवास करतात, त्यांच्यासाठी नायट्रोजन हवा चांगली मानली जाते. जे वेगाने कार दामटतात, त्यांच्यासाठी नायट्रोजन हवा भरणे चांगले ठरू शकते. रेसिंग कार आणि विमानाच्या टायर्समध्ये सक्तीने नायट्रोजन हवेचाच वापर करण्यात येतो. पण ज्यांना सामान्य हवा भरायची आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला ठरतो. रोज कार्यालयात जाणे, बाजारात जाणे अथवा जवळच्या शहरासाठी प्रवास करत असाल तर सामान्य हवा भरणे फायदेशीर ठरते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in