• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CA परीक्षेत पंजाबचा नूर सिंगला पहिला तर डोंबिवलीचा सोहन अनिल मांजरेकर देशात तिसरा

June 18, 2026 by admin Leave a Comment


इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटेंट्स ऑफ इंडियाने सीए फायनल मे 2026 परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेत पंजाबच्या पटीयालाचा नूर सिंगला हा 83.17% गुण मिळवत संपूर्ण देशात पहिला आहे. तर डोंबिवलीचा सोहन अनिल मांजरेकर देशात तिसरा (78.83% गुण)आला असून हावडा येथील रितीज सराफ(79.17%) याचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. चार्टर्ड अकाऊंटन्ट्सची परीक्षा अवघड परीक्षा मानली जात असते. या सीए परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईटचे ट्रॅफीक वाढले आहे.

सीए फायनल निकाल 2026 caresults.icai.org, icai.org या वेबसाईटवर करु शकता. सीए परीक्षेत पास होण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% तर एकूण मिळून 50% गुणांची गरज होती. जे या परीक्षेत अनुउत्तीर्ण झाले आहेत त्यांनी चिंता करण्याची काही गरज नसून आयसीएआयने दुसऱ्या प्रयत्नासाठी नोव्हेंबर 2026 च्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनची तारखेची घोषणा देखील केली आहे.

पटियालाचा नूर सिंगला बनला सीए टॉपर

सीए टॉपर लिस्टमध्ये पंजाबच्या पटियाला नूर सिंगला याने सीए अंतिम परीक्षेत एकूण 499 गुण मिळवत पहिला रँक मिळवला आहे. त्याच्या स्कोरमुळे त्याची टक्केवारी 83.17% इतकी झाली आहे. जी सीएसारख्या देशातील अवघड परीक्षेसाठी अविश्वसनीय आहे. नूर सिंगला याच्या यशाने त्याच्या पटियालातील कुंटुबाने जल्लोष केला आहे.सोशल मीडियावर देशभरातील चार्टर्ड अकाऊंट्स आणि स्टु़डन्ट्स नूर सिंगला याचे अभिनंदन करत आहेत.

  • AIR 1: Noor Singla (Patiala) – 499 Marks (83.17%)
  • AIR 2: Ritij Saraf (Howrah) – 475 Marks (79.17%)
  • AIR 3: Sohan Anil Manjrekar ( dombivli ) – 473 Marks (78.83%) 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in