• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bike Seat: बाईकची मागची सीट का असते उंच? काय कारण? रोज दुचाकीवर फिरणाऱ्यांना सुद्धा नाही माहित

June 27, 2026 by admin Leave a Comment


Bike Seat high: बाईकचे डिझाईन हे केवळ शोसाठी नसते. त्यात अनेक बारकावे असतात. या डिझाईनमागे सुरक्षा आणि बाईकची कामगिरी गृहित धरली जाते. अनेकदा लोक उंच सीट केवळ स्टाईलचा भाग मानतात. पण त्याचा उद्देश राईड अधिक सुरक्षित आणि संतुलित प्रवास करणे हा आहे. हे डिझाईन न केवळ बाईकला स्थिरता देते. पण लांब आणि वेगवान प्रवासात सुंतलन ठेवते. बाईक नियंत्रित राहण्यासाठी त्याचा वापर होतो.

या कारणामुळे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये काही बदल अत्यंत काळजीपूर्वक केले जातात. त्यामुळे ड्रायव्हर आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा प्रवास अधिक सुरक्षित होतो. वास्तविक बाईकमागील हा छोटासा बदल लवकर लक्षात येत नाही. तो डिझाईनचाच एक भाग वाटतो. हे एक साधारण फीचर वाटते. पण त्याचे मोठे फायदे हे त्यामागील अभियांत्रिकी करणात आहे. त्यामुळे रायडिंग एक्सपीरियंस पूर्णपणे बदलतो.

समतोल आणि नियंत्रणासाठी खास प्लॅन

उंच सीटचा सर्वात मोठा फायदा बाईकचे वजन संतुलित ठेवण्यासाठी होतो. जेव्हा मागे बसणारी व्यक्ती जेव्हा थोडी उंचीवर असते. तेव्हा बाईकचा गुरूत्वाकर्षण केंद्रबिंदु (center of gravity) सुधारतो. वेगाने प्रवास करता येतो. वळणाच्या रस्त्यावर त्याचा फायदा होतो. दुचाकीवरील नियंत्रण सुटण्याची भीती नसते. घसरण्याचा धोका अत्यंत कमी होतो. त्यामुळे अनेकदा हेलकावे घेत जाणारी बाईक सुद्धा एका नियंत्रित वेगात गतीने पुढे जाताना दिसते. हा एका उंच सीटचा फायदा मानल्या जातो.

मागील व्यक्तीला दिसतो समोरचा रस्ता

या डिझाईनचा अजून एक फायदा म्हणजे दृश्यमानता चांगली असते. मागील व्यक्तीला सुद्धा समोरचा रस्ता स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे मागील व्यक्तीला असुरक्षित वाटत नाही. ती व्यक्ती जास्त अलर्ट आणि आरामदायक वाटते. दूरच्या प्रवास सुद्धा आठवत नाही. मागील व्यक्तीला बाईकवर भीती कमी वाटते.

सरळ सीट असेल तर मागील व्यक्तीचा बागायती रुमाल, ओढणी मागील चाकात फसण्याची भीती असते. ओढणी चाकात अडकून अपघाताचे अनेक प्रकार घडले आहेत. सीट थोडे उंच असेल तर हा धोका कमी होतो. अपघाताचे प्रमाण कमी होते.

या डिझाईनचा एक मोठा फायदा मागील बसलेल्या व्यक्तीला होतो. सस्पेन्स सिस्टिमवर ताण येत नाही. खराब रस्ते, खड्डे आणि स्पीड ब्रेकरमुळे होणारे धक्के उंच सीटवर बसलेल्या व्यक्तीला जाणवत नाही.परिणामी पाठीला, कंबरेला आणि मानेला बसणारे झटके कमी होतात. पाठदुखी, कंबरदुखी आणि मानदुखीचा त्रास कमी होतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लेकीने लव्ह मॅरेज करताच बापाचा पारा चढला, मुलाच्या घरी जाऊन केलं भयंकर कृत्य; महाराष्ट्रात खळबळ!
  • जिओचा नवा धमाकेदार प्लान! 40 दिवसांसाठी स्वस्त रिचार्ज, मिळणार खास फायदे
  • मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखी १२ एसी लोकल,साध्या लोकल घटल्याने गर्दी वाढणार
  • केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट! मास्टरमाइंड सियाने पुण्यात नव्हे तर इथे… चेतनसोबतच्या ट्रीमध्ये काय घडलं?
  • सावधान… ते येतात, वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचं सांगतात अन्… मुंबईत बड्या हॉटेलमसोर काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in