
बिग बॉसच्या घरात 20 स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. या स्पर्धकांमध्ये एका रॅपरची देखील एन्ट्री झाली आहे. Yung DSA हा त्याच्या Yeda Yung या गाण्यामुळे चर्चेत आला. त्याच्या हटके एन्ट्रीने पुणेकरांचंही लक्ष वेधून घेतलं.
पुण्यात राहणाऱ्या यंग डिएसए याची बिग बॉसमध्ये एन्ट्री झाली आहे. त्याचे खरं नाव हर्ष विजय माचरे आहे. त्याचं पुणे शहर आणि मुळाशी नातं घट्ट आहे, हे त्याच्या रॅपमधून दिसून येते. त्याच्या रॅपवर मराठीचा प्रभाव पाहायला मिळतो.
यंग डीएसए हा पुण्याच्या येरवडा विभागात राहतो. त्याने वयाच्या 12 व्या वर्षांपासून रॅपिंग करायला सुरुवात केली. यंग डीएसएच्या रॅपमध्ये पुणे आणि स्थानिक संस्कृतीची झलक पाहायला मिळते. तसेच त्याच्या संगीतात देसी आणि स्थानिक बाज दिसतो. भारतीय हिप-हॉपमध्ये त्याची शैली वेगळी ठरते.
त्याने काही काळ बीपीओमध्ये नोकरी केली आहे. काही काळानंतर तो पूर्णवेळ संगीत क्षेत्राकडे वळला. त्याने एक 2024 मध्ये रिलीज झालं होते. परंतु त्याचे गाणं 2025 साली प्रंचड हिट झालं. त्याच्या गाण्याने त्याला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवून दिली.
यंग डीएसए याने भारतीय हिप-हॉप क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिगबॉसच्या घरात त्याचा देसी आणि मराठमोळा अंदाज पाहायला मिळेल. यंग डीएसए हिप-हॉप क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्यास यशस्वी ठरलाय.




Leave a Reply