
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी यवतमाळ सभा घेतली तर आज सकाळी तर आज सकाळी परभणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ठाकरे सध्या धाराशिव दौऱ्यावर असून यावेळी परळीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली. जेसीबीमधून फुलांची उधळण करत उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता.
परंड्यातील शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांना पाच ज्योतिर्लिंगांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी त्यांनी प्रतिमा हातात घेत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला.
धाराशिव हा ओमराजे निंबाळकर यांचा मतदारसंघ असल्याने या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत. अलीकडील राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहनही केले.
Leave a Reply