• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत…

July 11, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाबाबत मोठे संकेत दिले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर आता विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

यावर भाष्य करताना आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनीच नेतृत्व करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच देशाच्या पातळीवर म्हणजेच दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची राहील असंही कडू म्हणाले.

संजय राऊत यांच्या भविष्यवाण्या यापूर्वीही खऱ्या ठरल्या नसल्याचे सांगत बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टीका केली. राऊतांनी कोणत्या ज्योतिषाकडे हात दाखवला हे माहीत नाही, असा टोला देखील बच्चू कडू यांनी लगावला.

दरम्यान, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊ शकतात, तर चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम चेहरा ठरू शकतात, असे आज पत्रकार परिषदेत म्हटले होते. या विधानामुळे राज्यातील राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in